आयपॅड जेलब्रेक करू का?
* माझ्याकडे आयपॅड ५.१ आहे. यामध्ये आता पुढे अपटेड नसल्यामुळे त्यामध्ये नवीन अ‍ॅप्लिकेशन घेऊ शकत नाही. तर तो मला जेलब्रेक करायचा आहे. तर तसे करणे कितपत योग्य आहे. जेलब्रेक म्हणजे काय? – मिलिंद गिरधारी, औरंगाबाद.
’ आयफोन, आयपॅड किंवा आयओएस असलेले कोणतेही उपकरण अ‍ॅपलच्या जाचातून मुक्त करणे म्हणजे जेलब्रेकिंग होय. खरे तर तो अ‍ॅपलचा जाच नव्हे. सुरक्षा म्हणून अ‍ॅपलने आयओएसवर अनेक र्निबध आणले आहेत. यामुळे आपल्याला अनेक अ‍ॅप्स वापरण्यापासून रोखले जाते. दुसऱ्या उपकरणातून शेअरिंग करण्याचीही सोय नसते. यामुळे अनेकदा शेअरिंगची आवड असणाऱ्यांना आयफोनधारकांना आपण स्मार्टफोन शेअरिंगच्या जगात एकाकी असल्यासारखे भासते. पण आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो. अशा एकाकी भावना असलेल्या किंवा अ‍ॅपलचे अपडेट्स येणे बंद झालेल्या उपकरणांना पुढे वापरण्यायोग्य आणि अद्ययावत ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने जेलब्रेक केले जाते. जेणेकरून आपण आयओएसच्या बंधनातून मुक्त होतो. फोन जेलब्रेक करण्याची एक तंत्रप्रणाली आहे. जी पूर्ण करण्याची काहीशी किचकट प्रक्रिया आहे. यामुळे ती तज्ज्ञाकडून करून घेणे योग्य ठरते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपल्या फोनमध्ये आयओएस ऑपरेटिंग प्रणालीच काम करते. पण तेथे अ‍ॅपने विकसित न केलेल्या तिसऱ्याच कुणीतरी विकसित केलेले ‘सायडिया’ हे अ‍ॅप स्टोअर येते. या अ‍ॅपस्टोअरच्या माध्यमातून तुम्ही यापूर्वी आयओएसवर वापरू शकत नसलेले सर्व अ‍ॅप्स वापरू शकता. ‘सायडिया’ या अ‍ॅप स्टोअरला ‘आयसी’ या अ‍ॅप स्टोअरचा पर्याय आहे. जेलब्रेक केल्यामुळे आपल्याला विविध अ‍ॅप्स वापरता येणे शक्य होते. तर आपण फोन आपल्यापद्धतीने वापरू शकतो. म्हणजे होमस्क्रीनवर अ‍ॅप कुठेही ठेवता येणे इथपासून ते सध्या सुरू असलेले अ‍ॅप शट डाऊन करेपर्यंतच्या सुविधा यात मिळतात. मात्र या सर्वामध्ये अ‍ॅपलने पुरविलेली उच्च दर्जाची सुरक्षा आपण मुकतो. तसेच जेलब्रेक केलेले आयफोन्स किंवा आयपॅड्स क्रॅश होण्याचे प्रमाणही जास्त असते.

* मी डेस्कटॉपवर इंटरनेट वापरतो. माझ्याकडे वाय-फाय मोडेम नाही. मग मला हे इंटरनेट मोबाइलवर वापरायचे असेल तर काय करू.
– पुष्पराज देशमुख
’ सामान्यत: मोबाइलवरून डेस्कटॉपवर इंटरनेट जोडणी अनेकजण करत असतात. मात्र डेस्कटॉपवरून मोबाइलवर इंटरनेट जोडणी करावयाची असेल तर तुमचा अँड्रॉइड मोबाइल हा रूटेड असायला हवा. जर तो रूटेड असेल तर तुम्ही डेस्कटॉपवरील इंटरनेट मोबाइलवर वापरू शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्ही मोबाइल संगणकाशी जोडा. यानंतर सेटिंग्जमध्ये जा. तेथे अॅप्लिकेशन्स हा पर्याय निवडा. त्यानंतर डेव्हलपमेंटचा पर्याय निवडा. यानंतर यूएसबी डबिंग असा एक पर्याय असेल तो सुरू करा. संगणकावर अँड्रॉइड टूल इंटरनेटवरून डाऊनलोड करा. ते डाऊनलोड केल्यावर झिप फाइल एक्सट्रॅक्ट करा. यानंतर तुमच्या संगणकाच्या स्Rीनवर अँड्रॉइड टूल.ईएक्सई असा पर्याय येईल. तो रन करा. त्यानंतर सिलेक्ट डिवाइस असा पर्याय येईल. यामधून तुमचे उपकरण निवडा. त्यात डीएनएस निवडा. यानंतर समोर येणाऱ््या ‘स्टार्ट’ या बटणावर क्लिक करा. यानंतर तुमच्या मोबाइलमध्ये काही अ‍ॅप्स डाऊनलोड होतील. ते डाउनलोड झाल्यावर तुमच्या मोबाइलवर ‘यूएसबी टनल’ असा पर्याय दाखवणारा बॉक्स येईल. त्याला परवानगी द्या. यानंतर तुमच्या मोबाइलमध्ये इंटरनेट सुरू होईल. इंटरनेट वापरत असताना कदाचित तुम्हाला ‘नो नेटवर्क कनेक्शन’ असा संदेश येईल, पण त्याकडे लक्ष देऊ नका. तुमचे इंटरनेट चालू राहील.