मायक्रोसॉफ्टचा एक्सबॉक्स वन हा कन्सोल कसा आहे. श्रीधर वडाळकर, नेरुळ

एक्सबॉक्स प्रकारातील सर्वात नवीन व्हर्जन म्हणजे एक्सबॉक्स वन. गेमिंग कन्सोलची मेमरी प्रोसेसरची क्षमता, या कन्सोलला अधिक उत्तम बनविते. याची प्रोसेसिंग क्षमता इतकी उत्तम आहे की, साधारण गेमचा लीडिंग टाइम हा २५ सेकंदांइतका कमी आहे. साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या काळात भारतात दाखल झालेल्या या कन्सोलमध्ये मायक्रोसॉफ्टने उत्तम, असे गेम्स उपलब्ध करून दिले आहेत. या कन्सोलमध्ये आपल्याला सर्वोत्तम असा व्हिडीओ एक्स्पीरियन्स घेता येतो. याचा इंटरफेस थोडा गोंधळून टाकणारा असला तरी यामध्ये नव्याने दाखल झालेल्या फीचरमुळे ही समस्या काही प्रमाणात कमी होते, ते म्हणजे याची स्क्रीन आपण आपल्या मोबाइल, टॅब्लेटवर शेअर करू शकता; जेणेकरून आपणास टायिपग करणं सोयीचं ठरत ज्यामुळे फेसबुकसारखे इंटरनेट अ‍ॅप्लिकेशन्स आपण सहजपणे वापरू शकतो व ऑप्शन्समध्ये टाइप करून सिलेक्ट करणे सोयीचे होऊन जाते. शिवाय वर सांगितल्याप्रमाणे कीनेक्ट सुविधा जोडल्यावर एक्सबॉक्सचा गेमिंग एक्स्पीरीअन्स दुपटीने वाढतो

Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य
This Bhopal-based startup has impressed Anand Mahindra with its driverless car using Bolero model
बोलेरो मॉडेलचा वापर करून तयार केली Driverless Car ! भोपाळच्या स्टार्टअपवर आनंद महिंद्रा झाले खुश!
Microsoft announced the removal of WordPad from Windows Here is What apps can you use instead Must Read
आता मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये दिसणार नाही वर्डपॅड! तुम्ही कोणत्या ॲप्सचा करू शकता उपयोग? पाहा यादी…
How To Make Kharvas At Home With 1 Cup Milk Without Chikacha Dudh
१ वाटी दुधात बनवा विना चिकाचा खरवस; ‘ही’ सिक्रेट पेस्ट वाचवेल वेळ, मास्टरशेफचा स्पर्धक सॅमची रेसिपी, पाहा Video

मला मोबाइलवरील काही गेम्स किंवा व्हॉट्सअ‍ॅपसारखे अ‍ॅप्स संगणकावर वापरायचे आहेत, तर त्याला काही पर्याय आहे का?  – जयंत वराड, उस्मानाबाद

अ‍ॅण्ड्रॉइड ही सर्वाधिक वापरली जाणारी मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीम आहे. यामध्ये आपण अनेक गेम्स डाऊनलोड करतो. अनेकदा घरी असताना आपल्याला हे गेम्स संगणकावर असावेत असे वाटते. अशा वेळी तुम्ही मोबाइलमधील सबवे सर्फर किंवा अन्य गेम्स संगणकावर खेळू शकता. यासाठी तुम्हाला ब्ल्यूस्टक्स हे सॉफ्टवेअर तुमच्या संगणकात डाऊनलोड करून घ्यावे लागेल. हे सॉफ्टवेअर डाऊनलोड झाल्यावर ते संगणकात इन्स्टॉल करा. त्यानंतर सॉफ्टवेअर सेटिंगअप होईल. हे झाल्यावर तुम्हाला माय अ‍ॅप्स, टॉप चॅट्स असे पर्याय दिसतील. यातील माय अ‍ॅप्स पर्याय निवडा. यानंतर एक वन टाइम सेटअप येईल. हा सेटअप आल्यावर तुम्हाला तुमचे गुगलचे लॉगइन करावे लागेल. हे लॉगइन झाल्यानंतर तुम्ही तुम्हाला पाहिजे ते अ‍ॅप्स सर्च करून इन्स्टॉल करू शकता. यानंतर तुम्ही त्या इन्स्टॉल अ‍ॅपच्या माध्यमातून गेम्स खेळू शकता. यामध्ये तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपही वापरू शकता.