*  मला टीव्ही घ्यायचा आहे. तर मी फोर के किंवा फुल एचडीपैकी कोणता घेऊ यामध्ये मी गोंधळलो आहे. तर यापैकी कोणता घ्यावा.

-आकाश कुलकर्णी

*  यामध्ये तुम्ही फोर केचा टीव्ही घ्यावा.कारण फुल एचडी आणि फोर केमध्ये पिक्सेलचा खूप जास्त फरक आहे. यामुळे तुम्हाला चित्रांचा दर्जा फोर केमध्ये अधिक चांगला मिळू शकतो. फुल एचडीमध्ये १९२० बाय १०८० पिक्सेलचे रिझोल्युशन असते तर हेच रिझोल्युशन फोर केमध्ये ४००० बाय २१६० पिक्सेलचे मिळते. जेवढे पिक्सेल जास्त तेवढा चित्रांचा दर्जा चांगला असतो. यामुळे फोर केचा टीव्ही घेणे केव्हाही फायद्याचे ठरू शकते.

या सदरासाठी प्रश्न  kstechit@gmail.coml वर मेल करा.