केवळ बोलण्या-ऐकण्यापुरते आणि संदेश पोहोचविणारे मोबाइल फोन आता अधिक स्मार्ट झाले आहेत. संदेशवहन यंत्रणेहून अधिक काय या स्मार्टफोनमध्ये दडले आहे याचा शोध जो तो घेऊ लागला आहे. त्यामुळे अनेक विदेशी कंपन्यांनीही आहे या स्मार्टवर्गासाठी वेगवेगळ्या कल्पना विकसित करून विविध गटांसाठी स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत आणले आहेत. भारतीय बाजारपेठ जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने स्मार्टफोनची गर्दी येथे प्रामुख्याने आढळते. अशाच प्रकारे संगणक आणि स्मार्ट फोनची निर्मिती करणाऱ्या तैवानच्या असूस कंपनीने आतापर्यंत मध्यमवर्गीयांसाठी स्मार्टफोन भारतात उपलब्ध करून दिले आहेत. भारतीयांमध्ये आता किमतीपेक्षा फोनमध्ये काय काय अॅप्लिकेशन, फीचर्स आहेत याची उत्सुकता वाढू लागल्याने त्याची दखल घेत कंपनीने झेनफोन ३ शृंखलेतील झेन फोन ३, झेन फोन ३ डिलक्स, झेन फोन ३ अल्ट्रा, झेन फोन ३ लेजर हे चार प्रकारचे स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत आणले आहेत.

असूस झेनफोन ३ :
छायाचित्रणासाठी अत्यंत उपयुक्त
असूस झेनफोन ३ या स्मार्टफोनची अंतर्गत आणि बाह्य़ रचना ही वैशिष्टय़पूर्ण आहे. हे तो प्रत्येक वेळी हाताळताना सिद्ध होते. त्याची बांधणी उच्चतम अगदी सुंदररीत्या करण्यात आली आहे आणि त्याला तांत्रिकेतची उत्कृष्ट जोड आहे. हा फोन अॅण्ड्राइड ६.० मार्शमॅलोवर चालतो. त्यामध्ये ६०० सीडी-एम २ ब्रायटनेससह ५.५ इंचचा संपूर्ण एचडी डिस्प्ले लावला आहे. ज्याचे रेज्युलेशन १९२० बाय १०८० पिक्सल आहे. हा सुपर आयपीएस असलेला हा फोन आहे. फोनच्या एकूण बांधणीत ७७.३ टक्के जागा स्क्रीनसाठी देण्यात आल्याने व्हिडीओस गेम्स, अॅप्सचा मनमुराद आनंद घेता येतो. २.५डी कॉर्निग गोरिला ग्लासचे आच्छादन असल्याने फोनच्या पुढील वा मागील बाजूस कोणतेही ओरखडे पडण्याची शक्यता नाही. तो सहज हाताळता येतो. पुढच्या पिढीसाठी तो प्रेरणादायी ठरणारा आहे. यामध्ये अत्याधुनिक सोनी आयएमएक्स २९८ सेन्सरसह मागील बाजूचा १६ मेगा पिक्सल तर पुढील बाजूचा ८ मेगा पिक्सल कॅमेरा आहे. मागच्या कॅमेऱ्यासोबत डय़ुल टोन एलईडी फ्लॅश लावण्यात आला आहे. आकाशी रंगाची ग्लास, सुरक्षित लेन्स असल्याने वापरणे फार काही जोखमीचे नाही. काढलेल्या छायाचित्रातील रंगसंगती यातील दोष काढून त्यातील स्पष्टता, सत्यता आणि गुणवत्ता हा फोन प्रकट करतो. हा अनुभव हवा असेल तर झेनफोन ३ शिवाय पर्याय नाही असा दावा कंपनी करते. छायाचित्र चांगल्या प्रकारे यावे यासाठी दृष्यरूपातील किरणे, परिस्थितीचे व्यवस्थापन, सातत्याने पडणारा फरक या तीन गोष्टींचे तंत्र विकसित करून त्याचे एकत्रिकरण करण्यात आले आहे. त्यामुळे छायाचित्र ०.०३ सेकंदात तुमच्या फोनमध्ये कैद होते. या फोनचा प्रोसेसर क्लॉलकॉम सॅण्ड्रोगन ६२५, ऑक्टो कोर १४ एनएम आहे. ४ जीबी रॅम आणि अंतर्गत मेमरी ६४ जीबी असल्याने त्याचा वेग संगणकीयप्रमाणे अनुभवता येतो. मायक्रोएसडी कार्डही त्याला सहकार्य करतो.
अंदाजित किंमत रु. २१,९९९.

असूस झेनफोन ३ डिलक्स :
सुंदर मेटल बॉडी असूस झेनफोन डिलक्स हा झेनफोन ३च्या कुटुंबातील प्रमुख मॉडेल आहे. खोलवर विचार करून तत्त्वज्ञान प्रणाली वापरून याची डिझाइन तयार केली आहे. अॅल्युमिनियम धातूचे मिश्रण करून तो तयार केल्याने त्याला मजबुती आली आहे. संपूर्ण मेटल बॉडी असलेला हा जगातील पहिला फोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. नेटवर्क देणारी अँटिना ही अदृश्य रूपात आहे.
असूस झेनफोन डिलक्समध्ये ५.७ इंचचा फूल एचडी डिस्प्ले आहे. ज्याचे रेज्युलेशन १९२० बाय १०८० पिक्सल आहे. फोनमध्ये १०० टक्के एनटीएससी कलरचा वापर करण्यात आल्याने एखादा व्हिडीओ पाहताना आपण तो आपण टीव्हीवर पाहतो आहे असा आभास होतो. फोनच्या एकूण बांधणीत ७७.३ टक्के जागा स्क्रीनसाठी देण्यात आला आहे. क्लॉलकॉम स्नैपड्रैगन ८२० प्रोसेसरसह, क्लॉलकॉम अॅड्रीनो ५३०जीपीयू, एक्स १२ एलटीई मोडेम, ६ जीबी रॅम आहे. अंतर्गत मेमरी ६४ जीबी आहे. त्यामुळे अॅप्स, गेम्स, व्हिडीओ आणि माध्यमांसाठी हा फोन चांगलाच उपयुक्त आहे. या फोनमध्ये अविश्वसनीय असा मागील कॅमेरा २३ मेगा पिक्सलचा देण्यात आला आहे. तर पुढील कॅमेरा ८ मेगा पिक्सलचा आहे. क्लॉलकॉम क्वीक चार्ज ३.० तंत्रज्ञानामुळे बॅटरी काही मिनिटांतच चार्ज होते. त्यामुळे चार्जिगसाठी फार वेळ वाट पाहावी लागत नाही. त्याचप्रमाणे काढलेल्या छायाचित्रांची गुणवत्ता, काढण्यासाठी लागणारी गती आदी काही गोष्टी या झेनफोन ३ प्रमाणेच आहेत.
अंदाजित किंमत रु. ४९,९९९.

असूस झेनफोन अल्ट्रा :
अल्ट्रा व्हिजन. अल्ट्रा साऊंड
कॉम्प्युटेक्स २०१६चा सुवर्ण विजेता असूस झेनफोन अल्ट्राची विविध माध्यमे प्रेमिकांसाठी निर्मिती केली आहे. या फोनमध्ये ६.८ इंचचा फूल एचडी डिस्प्ले आहे. ज्याचे रेज्युलेशन १९२० बाय १०८० पिक्सल आहे. ९५ टक्के एनटीएससी कलरचा वापर करण्यात आला आहे. या फोनची तांत्रिक बाजू जमेची ठरली आहे. असूस ट्र लाइफ अधिक व्हिडीओ तंत्रज्ञान जे ४ के यूएचडी टीव्हीने जोडले गेले आहे. त्यामुळे फोनमधील प्रतिमा आणि आवाज अगदी टीव्हीसारखी सुस्पष्ट आणि रंगसंगतीने गुणवत्तापूर्वक पाहण्यास आणि ऐकावयास मिळते. काहीशी झेनफोन ३ डीलक्ससारखीच यंत्रणा या फोनमध्ये पाहावयास मिळते. ज्यामध्ये सामथ्र्यशील पाच मॅग्नेट स्टीरिओ स्पीकर आणि एलएक्सपी स्मार्ट अॅम्प्लिफायरचा समावेश आहे. त्यामुळे या फोननेही आवाजाची गुणवत्ता राखली आहे. हा फोनही पूर्णपणे मेटलचा असून फोनच्या एकूण बांधणीत ७९ टक्के जागा स्क्रीनसाठी देण्यात आली आहे. या फोनमध्ये ६.८ इंचचा फूल एचडी डिस्प्ले आहे. यामध्ये ऑक्टो कोर क्लॉलकॉम स्नैपड्रैगन ६५२ प्रोसेसर, ओक्टो कोर, २८ एनएमक्स ८ एलटीई मोडेम आणि वायफाय ८०२.११ एसी, एम-एसआयएमओ कनेक्टिव्हिटी, अॅड्रीनो ५१० ग्राफिक्स आहे. ४ जीबी रॅम आहे. अंतर्गत मेमरी ६४ जीबी आहे आणि १२८ जीबीचे पर्याय खुले आहेत. मागील कॅमरा २३ मेगा पिक्सल तर पुढील कॅमरा ८ मेगा पिक्सलचा आहे.
अंदाजित किंमत रु. ४९,९९९ .

असूस झेन फोन ३ लेसर : 
उच्चत्तम गतिशीलता
झेनफोन ३ लेसरमध्ये ५.५ इंचाची फुल एचडी २.५ डी कव्हर्ड डिस्प्ले आहे. आकार १४९-७६-७.९ एमएम आकाराच्या या फोनमध्ये ६४ बिट ऑक्टा कोर क्लॉलकॉम स्नैपड्रैगन ४३० प्रोसेसरसह ४ जीबी रॅम देण्यात आली आहे. अंतर्गत मेमरी ३२ जीबी आहे. रॅमच्या बाबतीत झेनफोन ३ लेसर हा डिलक्स, अल्ट्रा फोनप्रमाणेच असल्याने कमी किमतीत जादा गतिशीलता देतो. याचा मागील कॅमेरा १३ मेगा पिक्सलचा आहे तर पुढील कॅमेरा ८ मेगा पिक्सलचा आहे.अॅण्ड्राइड ६.० मार्शमैलोवर चालणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये ३००० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे.
अंदाजित किंमत रु. १८,९९९.
सुहास धुरी – suhas.dhuri@expressindia.com