विद्या प्रसारक मंडळाच्या बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाचा विज्ञानाचा व राष्ट्रीय छात्र सेनेमध्ये तृतीय वर्षांत असणारा अतुल जाधव हा दिल्ली येथे भरलेल्या राष्ट्रीय खेळांमध्ये एनआयसी कॅम्पतर्फे आयोजित १०० मीटर अ‍ॅथेलीट स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून प्रथम आला.

अतुल हा एनसीसीचा विद्यार्थी प्रथम अमरावती येथे भरलेल्या आयजीसी कॅम्पमध्येही शंभर मीटरच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून प्रथम आला होता. त्यानंतर त्याची आरडीसी कॅम्पसाठी दिल्लीला निवड झाली आणि दिल्लीमधील कॅम्पमध्ये त्याने ही अद्वितीय कामगिरी दाखवली. यावर्षी ऑलिम्पिक गेम्समध्ये बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांचा सहभाग होता. आता राष्ट्रीय स्तरावरील हे सुवर्णपदक म्हणजे महाविद्यालयासाठी भूषणावह बाब आहे, असे उद्गार महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. माधुरी पेजावर यांनी काढले आणि अतुलला शुभेच्या देण्यात आल्या. अतुल याची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.