राज्याच्या पोलीस महासंचालकांची अभिनव कल्पना; राज्यात आगळावेगळा प्रयोग
तुम्ही सुजाण आणि नागरिक आहात.. पोलिसांची मदत करून समाजकार्य करायचे आहे, आजूबाजूला घडणाऱ्या अन्यायाबाबत आवाज उठवायचा आहे.. मग मोबाइलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करा आणि ‘पोलीस मित्र’ बना! पुढील आठवडय़ापासून हे अ‍ॅप सुरू होणार असून ‘पोलीस मित्र’ बनविण्यासाठी प्रथमच राज्यात असा आगळावेगळा प्रयोग केला जात आहे.
राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी पोलीस मित्र ही नवीन संकल्पना अस्तित्वात आणली. ज्यांना पोलिसांना पर्यायाने समाजाला मदत करायची त्यांनी पोलीस मित्र बनावे, अशी ही संकल्पना आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात संपर्क साधून पोलीस मित्र बनता येते. परंतु अनेकांना पोलीस ठाण्यात जायचे कसे, कुणाला भेटायचे हे माहीत नसते किंवा त्यांना विशिष्ट विभागासाठी काम करायची इच्छा असते. ही गरज लक्षात घेऊन ‘पोलीस मित्र’ हे मोबाइल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. प्रत्येक दक्ष नागरिक हा पोलिसांचा मित्रच असतो, परंतु अनेक जणांना प्रत्यक्ष सहभागी होऊन पोलिसांना मदत करण्याची इच्छा असते. त्यातून पोलीस मित्र संकल्पनेचा उदय झाला. सध्या राज्यात दीड लाख पोलीस मित्र आहेत. या मोबाइल अ‍ॅपमुळे कुणालाही पोलीस मित्र बनता येणे सहज शक्य होणार आहे. सध्या या अ‍ॅपची चाचणी सुरू असून पुढील आठवडय़ापासून ते सुरू होईल.

समाजासाठी काहीतरी करण्याची ऊर्मी असते. काही जणांना वाहतुकीसाठी काम करायचे असते, तर काहींना तंत्रज्ञानात मदत करायची असते. ते सर्व ‘पोलीस मित्र’ बनून पोलिसांना मदत करू शकणार आहेत. सर्वाना पोलीस ठाण्यात जाणे शक्य नसायचे. त्यासाठी हे अ‍ॅप उपयोगी आहे. हे अ‍ॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड करायचे. तेथील फॉर्मवर आपले नाव आणि माहिती भरायची, कुठली वेळ पोलिसांना मदतीसाठी देऊ शकता हे नमूद करून सबमिट करायचे. त्यानंतर तुम्ही पोलीस मित्र बनू शकता.
प्रवीण दीक्षित, पोलीस महासंचालक

Kharge on narendra modi
“मोदींनी तरुणांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले”, मल्लिकार्जुन खरगेंचे पंतप्रधानांवर गंभीर आरोप; काय म्हणाले?
Loksatta editorial indian Ambassador Akhilesh Mishra has slammed an Irish Newspaper for publishing an editorial on PM Narendra Modi
अग्रलेख: आजचा मुत्सद्दी, उद्याचा मंत्री?
Analysis on Environmental Component in Gazetted Civil Services Joint Pre Examination and State Services Pre Examination
Mpsc मंत्र: पर्यावरण घटक
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

पोलीस मित्राचे कार्य
* पोलीस मित्र होण्यासाठी कुठल्याही खास पात्रतेची आवश्यकता नाही. आवड आणि तुमच्या नावावर एकही गुन्ह्य़ाची नोंद नसलेली व्यक्ती पोलीस मित्र बनू शकते.
* त्यांना पोलीस ठाण्यातून ओळखपत्र देण्यात येते. दररोज किंवा सुटीच्या दिवशी पोलिसांच्या कामात हे पोलीस मित्र मदत करू शकतात.
* बंदोबस्त, उत्सवांचा काळ, जनजागृती मोहिमा, सामाजिक तंटे असतील तर या पोलीस मित्रांची मदत होऊ शकेल.
* एखादा तंत्रज्ञ पोलिसांना तांत्रिक कामात मदत करू शकतो. याशिवाय परिसरात घडणाऱ्या अपप्रवृती, अनैतिक धंदे, समाजविघात कृत्य याबाबत ते पोलिसांना माहिती देऊ शकतील.