दलालाला अटक, लाखोंची रेल्वे तिकिटे जप्त
वसईमध्ये रेल्वे तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचे समोर आले आहे. रेल्वे सुरक्षा बलाने एका दलालाला अटक करून त्याच्याकडून लाखो रुपयांची तिकिटे जप्त केलीे.
वसई, विरार आणि नालासोपारा येथे मोठय़ा प्रमाणावर तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचीे माहितीे रेल्वे सुरक्षा बलाला मिळालीे होतीे. त्यानुसार छापा टाकून पोलिसांनी एका दलालाला अटक केलीे. त्याच्याकडे अनेक बनावट ओळखपत्रे सापडलीे असून त्याच्या आधारावर मिळवलेलीे लाखो रुपयांची तिकिटे जप्त केलीे आहेत. संतोष पांडे असे या आरोपीेचे नाव असून तो नालासोपऱ्याच्या संतोष भुवन येथे राहतो. त्याच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी १ लाख ३२ हजारांचीे तिकिटे जप्त केलीे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीेनुसार आरोपी या टोळीचा एक सदस्य आहे. यात रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचाही सहभाग असण्याचीे शक्यता आहे. हा दलाल एका तिकिटामागे प्रवाशांकडून १५०० ते दोन हजार रुपये उकळत असे. या टोळीचे सदस्य बनावट ओळखपत्राच्या आधारे रेल्वेकडून तिकीट खिडकी उघडण्याच्या आतच तिकिटे विकत घेत असत. त्यामुळे तासन्तास रांगेत उभे राहणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वेचीे तिकिटे मिळत नव्हतीे. हे दलाल मग प्रवाशांच्या असहाय्यतेचा फायदा उचलून त्यांना अतिशय चढय़ा भावात ही तिकिटे विकत होतीे. या टोळीत आणखी कुणीे सहभागीे आहेत, त्याचा आम्ही तपास करत असल्याचे रेल्वे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. लोकांना कन्फर्म तिकिटे मिळत नव्हतीे. परंतु दलालांकडून घेतलेली तिकिटे कन्फर्म होत होतीे. याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.