डोंबिवली : कल्याण येथे राहणारी प्राजक्ता गुप्ता (२९) ही महिला लोकलने प्रवास करत असताना चोरटय़ाने तीची बॅग खेचली. त्यावेळी त्या चोराचा पाठलाग करत असताना लोकलची धडक बसून तिचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.
कल्याण येथे राहणारी प्राजक्ता ही नवी मुंबई महापे येथे एका आयटी कंपनीत कामाला होती. गुरुवारी रात्री कामावरुन परतत असताना ठाणे ते कल्याण असा लोकलने प्रवास करीत होती. कल्याण पत्रीपूल नजीक गाडी थांबताच दारात उभ्या असलेल्या प्राजक्ता हिच्या हातातील बॅग खेचून पळ काढला. प्राजक्ताने ट्रेन मधून उडी मारुन चोरटय़ाचा पाठलाग केला. यावेळी कल्याण हून सीएसटीकडे जाणाऱ्या एका लोकलने प्राजक्ताला जोरदार धडक दिल्याने यात तिचा दुदैवी मृत्यू झाला.