आपल्याच धुंदीत अवतीभोवती फिरत राहणं, स्वच्छंद बागडणे काहींना खूप आवडते. आपण आपल्या अवतीभोवती अशा अनेक गोष्टी पाहतो. मात्र हे काही फक्त माणसांबाबतीतच घडते असे नाही. काही फुलपाखरेही अशीच आपल्या मस्तीत वावरताना पहायला मिळतात. कॉमन क्रो हे अशाच फुलपाखरांपैकी एक आहे.
खरे म्हणजे आपल्या आजूबाजूला भक्षक टपलेले असतानाही कॉमन क्रो रमतगमत फिरू शकतो. कारण त्यांच्या अंगात असणाऱ्या विषारी द्रव्यामुळे भक्षक त्यांना खाऊ शकत नाहीत. सुरवंट अवस्थेमध्ये असतानाच त्यांना ही विषारी द्रव्य प्राप्त होतात. झाडांच्या पानांवर कॉमन क्रोची मादी अंडी घालते. अंडय़ांमधून बाहेर आलेल्या अळ्या लंब गोलाकार आकाराच्या असतात. त्यांच्या अंगावर काळ्या, पांढऱ्या आणि तपकिरी रंगांचे उभे पट्टे असतात. सुरवंट विषारी पाने खातानाही आधी त्यांच्या पाठीमागील भागात असलेल्या शिरा खातात. त्यामुळे पानांना होणारा विषारी द्रव्यांचा पुरवठा कमी होतो. त्यानंतर पानाचा हिरवा भाग खायला सुरूवात करतात. पानात असणारे विषारी द्रव्य पचविण्याची ताकद त्यांना उक्रांतीतून मिळवली आहे. त्यांचे कोश हे अतिशय सुरेख आणि सोनेरी रंगाचे असतात. साधारणत: मध्यम आकाराच्या या फुलपाखरांचा रंग चकचकीत काळा असतो. पंखांच्या खालच्या बाजूस हाच रंग काहीसा तपकिरी असतो. पंखांच्या कडांना खालच्या आणि वरच्या दोन्ही बाजूस पांढऱ्या ठिपकांच्या दोन रंगांची नक्षी असते. फुलांवरती संथ गतीने उडत राहणे त्यांना फार आवडतं. चिखलावर बसून त्यातील पाणी शोषून घेतानाही ही फुलपाखरे नेहमी दिसतात. संपूर्ण दक्षिण आशियाई क्षेत्रात यांचा वावर आहे. त्यातही दक्षिण भारतात आणि विशेषत: सह्य़ाद्रीच्या डोंगरांमध्ये ती मोठय़ा प्रमाणात आढळून येतात. कॉमन क्रो फुलपाखरू स्थानिक स्थलांतर करतात आणि त्यामुळे विविध प्रकारच्या वातावरणामध्ये त्यांचा आढळ असतो.
कॉमन क्रो फुलपाखरांना भक्षक खाऊ शकत नाहीत. त्यामुळे काही फुलपाखरं जी भक्षकांना सहज बळी पडतात. उदा. मलाबार दावेन, सिलोन, पामफ्लाय इत्यादी फुलपाखरं स्वत:ला कॉमन क्रोसारखं रंगरूप घ्यायचा प्रयत्न करतात. अशारितीने ते भक्षकांपासून स्वत:चे संरक्षण करतात. त्याला शास्त्रीय भाषेत बरेसियन मिमिक्री असं म्हटलं जातं. साधारणत: आठ हजार फूट उंचीपासून समुद्र सपाटीपर्यंत त्यांचं भ्रमण चालतं. फुलामधील मधाबरोबरच कुजणाऱ्या पाला पाचोळ्यामधील रसही ही फुलपाखरं शोषून घेतात. एकूणच काय आपल्याकडे अशी नेहमी दिसणारं कॉमन क्रो हे एक सुरेख स्वच्छंदी फुलपाखरू आहे.

why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
narayana murthy experienced hunger for 120 hours hitchhiking in Europe 50 years ago but what happens your body starvation 5 day doctor said
नारायण मूर्ती राहिले होते १२० तास उपाशी; पाच दिवस उपाशी राहिल्याने शरीरावर काय परिणाम होतात?
tiger jumps 20 feet to cross river vide
वाघ की रॉकेट? वाघाच्या उडीची सोशल मीडियावर एकच चर्चा…सुंदरबनमधील VIDEO व्हायरल