सकल महाराष्ट्राचे रसिकाग्रणी अशी ख्याती असलेले दिवंगत रामूभैय्या दाते यांच्या नावाने साहित्य-कला क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या एका कलावंताला यंदापासून पुरस्कार घेण्याची घोषणा त्यांचे पुत्र सुप्रसिद्ध गायक अरुण दाते यांनी केली आहे.
आपल्या अभ्यासपूर्ण निवेदनाने अवघ्या महाराष्ट्राला भुरळ घालणाऱ्या ठाण्यातील धनश्री लेले पहिल्या रामूभैय्या दाते पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. रामूभैय्या दाते यांच्या पुण्यतिथी दिनी ३ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार त्यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. सोमवार ४ मे रोजी अरुण दाते ८१ व्या वर्षांत पदार्पण करीत असून यानिमित्ताने अकादमीने या पुरस्काराची घोषणा केली आहे.