डोंबिवलीतील औद्योगिक वसाहत परिसरातील प्रोबेस एंटरप्राईजेस कंपनीत रासायनिक भट्टीच्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या दहापर्यंत जाऊन पोहोचली आहे. या कंपनीचे संचालक नंदन वाकटकर, सुमीत वाकटकर आणि स्नेहल वाकटकर यांचे मृतदेह शुक्रवारी मिळाले. घटनास्थळी मातीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरूच असून, ढिगाऱ्याखाली आणखी काही मृतदेह आहेत का, याचा शोध घेण्यात येतो आहे. दरम्यान, या प्रकरणी ठाणे पोलिसांनी कंपनीच्या मालकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
‘ज्वाला’ मुखावर डोंबिवली!
प्रोबेस एन्टरप्राईसेस कंपनीत गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास रासायनिक भट्टीचा शक्तीशाली स्फोट झाला. स्फोटानंतर लागलेल्या आगीत कंपनी भस्मसात झाली असून पाच किलोमीटरचा परिसर स्फोटाने हादरल्याने डोंबिवलीत भयकंप पसरला. जखमींमध्ये कामगारांची संख्या मोठी असून सर्वावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींचा सर्व खर्च सरकार उचलेल तसेच या स्फोटाची सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दुर्घटनास्थळी भेट दिल्यानंतर केली.
डोंबिवलीत भयकंप..
प्रोबेस कंपनी ही डॉ. विश्वास वाकटकर यांनी १९८४ मध्ये सुरू केली आहे. या स्फोटात त्यांचा मुलगा नंदन वाकटकर (३२) तसेच सुमीत वाकटकर (३०) आणि सून स्नेहल वाकटकर (२८) हे तिघे मृत्युमुखी पडल्याचे शुक्रवारी निष्पन्न झाले. याच कंपनीत काम करणारा सुशांत कांबळे (२६) हा तरुण अद्याप बेपत्ता आहे. त्याचा शोध सुरू आहे.
आगडोंबिवली