डोंबिवलीत भरणाऱ्या ९० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे तीन दिवसाचे कार्यक्रम संयोजक आगरी युथ फोरमने जाहीर केले. तीन दिवसांच्या कार्यक्रमात १९६ साहित्यिक, कवी, विविध क्षेत्रातील दिग्गज यांच्या विचारांची मेजवानी रसिकांना चाखण्यास मिळणार आहे. दोन वेगळ्या भरगच्च कवी संमेलनामध्ये राज्यभरातील एकूण निवडक ६६ कवी सहभागी होणार आहेत. साहित्य संमेलन स्थळाला पु. भा. भावे साहित्य नगरी नाव देण्यात आले आहे.

संमेलनाचे वेळापत्रक

Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
marathi sahitya sammelan, Delhi,
यंदा साहित्य संमेलनाचा मांडव थेट दिल्लीत? महामंडळाच्या बैठकीत जे ठरले….
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
pune set exam marathi news, set exam registration marathi news
‘सेट’ परीक्षेसाठी उमेदवार नोंदणीत वाढ; पारंपरिक पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा

शुक्रवार, ३ फेब्रुवारी

(शं. ना. नवरे सभामंडप)

*  सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडी. गणेश मंदिर ते साहित्य संमेलन नगरी. सहभाग-जगन्नाथ पाटील, राजाभाऊ पाटकर, अच्युत कऱ्हाडकर, शंकरकाक भोईर, आबासाहेब पटवारी, मधुकर चक्रदेव. सकाळी १० वा. ध्वजारोहण. अ. भा. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या उपस्थितीत. सकाळी १०.१५ वा. रा. चि. ढेरे ग्रंथग्रामचे संमेलन अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन.

*  दुपारी चार वाजता शं. ना. नवरे सभा मंडपात उद्घाटन सोहळा. उपस्थिती मावळते अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, उद्घाटन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, संमेलन अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, हिंदी कवी विष्णू खरे, समीक्षक डॉ. म. सु. पाटील, पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खा. कपील पाटील, खा. श्रीकांत शिंदे, महापौर राजेंद्र देवळेकर.

*  संध्याकाळी ७ वा. कवी संमेलन – अध्यक्ष सुखदेव ढाणके. अशोक बागवे, राजीव जोशी, डॉ. सुलभा कोरे, प्रा. दामोदर मोरे, अनुपमा उजगरे, वृषाली किन्हाळकर यांच्यासह ३१ कवींचा सहभाग.

शनिवार, ४ फेब्रुवारी

सावित्रीबाई फुले रंगमंदिर

*  स. ९ वा. अध्यक्षीय भाषणावर चर्चा. सहभाग : विजय चोरमारे, डॉ. रामचंद्र काळुंखे, भानू काळे, डॉ. अनिल नितनवरे, श्याम जोशी.

*  सकाळी ११.३० वा. बदलती अर्थव्यवस्था परिसंवाद सहभाग-अनिल बोकील, चंद्रशेखर टिळक, डॉ. जगदीश कदम, डॉ. श्रीकांत बाराहाते, यमाजी मालकर, सारंग दर्शने, वीरेंद्र तळेगावकर.

*  दु. २ वा. ग्रामीण स्त्री वास्तव-सहभाग-डॉ. मधुकर वाकोडे, डॉ.प्रवीण बांदेकर, प्रा. ललिता गादगे, सुशीला मुंडे, डॉ. ईश्वर नंदपुरे, डॉ. राजेंद्र माने, प्रा. वृंदा भुस्कुटे.

*  दुपारी ४ वा. चर्चासत्र.  साहित्य व्यवहार व माध्यमांचे उत्तरदायीत्व- प्रा. रा. रं बोराडे, संजय आवटे, डॉ. उदय निरगुडकर, मल्हार अरणकल्ले, अरूण म्हात्रे, प्रकाश एदलाबादकर.

*  संध्या. ५.३० वा. काव्यानुभव-प्रभा गणोरकर, अशोक नायगावकर, संदीप खरे, श्रीकांत देशमुख, किरण येले.

*  संध्या. ७ वा. बहुभाषीक संमेलन.

शनिवार, ४ फेब्रुवारी

शं. ना. नवरे सभामंडप

* सकाळी ९ वा. उद्योजक जयंत म्हैसकर, चित्रपट निर्माती अनुया म्हैसकर यांची मुलाखत.

* सकाळी ११ वा. ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, चित्रकार चित्रा ठाकूर यांचा सत्कार.

* दुपारी १२ वा. बालकुमार मेळावा. बालकुमारांसाठीच्या लेखनाचे काय झाले-सहभाग डॉ. न. म. जोशी, बाबा भांड, एकनाथ आव्हाड, नरेंद्र लांजेवार, राजीव तांबे, सुरेश सावंत, शोभा भागवत, मयुरेश साने.

* दुपारी १ वा. बालकुमार प्रतिभाविश्व- वर्षां भावे, डॉ. सलील कुलकर्णी, अस्मिता पांडे, सौरभ सोहोनी.

* दु. २ वा. शोध युवा प्रतिभेचा- ‘आम्हालाही काही सांगायचे आहे’. सहभाग जयप्रद देसाई, अनिकेत आमटे, सुबोध भावे.

* दु. ४ वा. युध्दस्थ कथा, सहभाग शशिकांत पित्रे, भूषण गोखले, अभय पटवर्धन, विश्वास नांगरे पाटील, अनुराधा प्रभुदेसाई.

* संध्या. ७ वा. आगरी कलादर्शन सांस्कृतिक कार्यक्रम.

शनिवार, ४ फेब्रुवारी

डॉ. आनंदीबाई जोशी सभा मंडप

* दु. १२ वा. पुरोगामी महाराष्ट्र व वाढती असहिष्णुता – प्रा. बाळकृष्ण कवठेकर, प्रा. नीरजा, प्रा. भास्कर चंदनशिव, प्रा. राजेंद्र दास, डॉ. नरेशचंद्र, राकेश वानखेडे, चांगदेव काळे.

* दु. १.३० वा. नवोदित लेखक मेळावा उद्घाटन- चिन्मय मांडलेकर.

* दु. २ वा. ‘नवोदित लेखन आव्हाने’ – मनस्विनी रवींद्र, प्रशांत आर्वे, रवी कोरडे, घन:श्याम पाटील, सचिन केतकर.

* दु. ३.३० वा. नवे लेखन- अमृता सुभाष, आशुतोष जावडेकर, डॉ. अरूंधती वैद्य, श्रीधर नांदेडकर.

* संध्या. ५ वा. नवी कवीता- हर्षदा सौरभ, चेतन फडणवीस, माधवी मुठाळ, गिरीश खारकर, गोविंद नाईक, स्पृहा जोशी.

रविवार, ५ फेब्रुवारी

शं. ना. नवरे सभामंडप

*  सकाळी ९.३० वा. कवी संमेलन- प्रा. शुक्राचार्य गायकवाड व ३४ कवींचा सहभाग.

*  स. ११.३० वा. प्रतिभायन- मेधा पाटक, रामदास भटकळ, अच्युत गोडबोले. मालविका मराठे, वंदना बोकील.

*  दु. १.३० वा. विचारजागर-सत्यपाल महाराज चिंचोळकर.

*  दु. २.३० वा. मुलाखत-रंगकर्मी कांचन व कमलाकर सोनटक्के.

रविवार, ५ फेब्रुवारी

सावित्रीबाई फुले रंगमंदिर

*  स. ११ वा. मराठी समीक्षेची समीक्षा- डॉ. हरिश्चंद्र थोरात, डॉ. आनंद पाटील, राहुल कोसंबी, शैलेंद्र लेंडे, गंगाधर पाटील, पी. विठ्ठल, सीमा भिसे, नितीन रिंढे.

*  दु. २ वा. साहित्य प्रवाहांची सद्यस्थिती- डॉ. उल्हास कोल्हटकर, हृषीकेश कांबळे, जुल्फी शेक, लक्ष्मण टोपले, मीना गोखले, प्रदीप पाटील.

*  संध्या. ५ वा. कथाकथन. सुनील गायकवाड, अरूण म्हात्रे.

रविवार, ५ फेब्रुवारी

आनंदीबाई जोशी सभामंडप

*  स. ९.३० वा. आम्हीच मराठीचे मारेकरी- डॉ. सुधीर रसाळ, ज्ञानेश महाराव, अ‍ॅड. शांताराम दातार, डॉ. दीपक पवार, आनंद मेणसे, रमेश जाधव, कृष्णाजी कुळकर्णी, कमलाकर कांबळे, विजय कदम.

*  संध्या. ५ वा. खुले अधिवेशन व समारोप. उपस्थिती शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, डॉ. अक्षयकुमार काळे.

*  संध्या. ७ वा. सांस्कृतिक कार्यक्रम.

संमेलनाच्या ग्रंथदिंडीनिमित्ताने नववर्ष स्वागतयात्रेची तालीम

डोंबिवली : डोंबिवलीत होणाऱ्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने होणार आहे. या दिंडीत ७८ शाळांमधील सुमारे ९ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तसेच शाळा, विविध सामाजिक संस्थांचे ४० चित्ररथ दिंडीत सामील होणार आहेत. ढोलपथक, भजनीमंडळ, लेझीम पथकही यामध्ये सहभागी होणार आहेत. डोंबिवली शहरातील नववर्ष स्वागतयात्रा ही नेहमीच औत्सुक्याचा विषय ठरली आहे. या स्वागतयात्रेचे आयोजन करणारे गणेश मंदिर संस्थानचे अच्युत कऱ्हाडकर यांच्याकडेच साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीची धुरा हाती देण्यात आली आहे. ग्रंथदिंडीची रचना पाहता ही दिंडी नववर्ष स्वागतयात्रेची रंगीत तालीमच ठरणार असल्याचे दिसते. आयोजन समितीनेही या वस्तुस्थितीस दुजोरा दिला आहे.

फेब्रुवारी महिन्यात ३ तारखेला साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने होणार आहे. दिंडीत सहभागी होणाऱ्या शाळा विविध संतांचे व क्रांतिकारकांचे चित्ररथ साकारणार आहेत. साहित्य महामंडळाचा एक मुख्य चित्ररथ दिंडीतील पालखीच्या पाठी अग्रस्थानी असेल. या रथावर संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. त्यासोबतच त्यांचे ग्रंथ, साहित्य या रथावर मांडण्यात येणार आहे. यासोबतच राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या शाळा स्वामी विवेकानंदांचा चित्ररथ, टिळकनगर शाळा लोकमान्य टिळक यांचा चित्ररथ तर ओमकार इंटरनॅशनल स्कूल संतांचे वाङ्मय चित्ररथात मांडणार आहे. तसेच काही शाळा क्रांतिकारकांचे साहित्य चित्ररथात मांडणार आहेत. यासोबतच शाळेमधील स्काऊट गाइड व एनसीसी पथके सहभागी होणार आहेत.

ग्रंथदिंडी ज्या मार्गावरून मार्गस्थ होणार आहे, त्या मार्गावर संस्कार भारतीच्या वतीने रांगोळी काढण्यात येणार आहे. त्यामध्ये संतांच्या ओव्या रेखाटण्यात येणार आहेत. सकाळी ८ वाजता श्री गणेश मंदिर संस्थान येथे गणेशपूजन करून ग्रंथदिंडीची सुरुवात होईल. त्यानंतर अप्पा दातार चौक, बाजी प्रभू चौक, चार रस्ता, डॉ. राजेंद्र प्रसाद मार्गावरून पारसमणी चौक अशी मार्गस्थ होऊन सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल येथील पु. भा. भावे साहित्यनगरी सभामंडपाच्या येथे दिंडीची समाप्ती होईल. त्यानंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित होणार असल्याचेही कऱ्हाडकर यांनी सांगितले.

१० ते १२ लोकांची मिळून एक ग्रंथदिंडी समिती आम्ही नेमली आहे. कल्याण-डोंबिवली शहरातील एकूण १५० शाळांपैकी ७८ शाळांमधील ९ हजारांच्या आसपास विद्यार्थी या दिंडीत सहभागी होतील अशी आकडेवारी शाळांच्या माध्यमातून आली आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या मार्च महिन्यात २८ तारखेला गुढीपाडवा असल्याने ही नववर्ष स्वागत यात्रेची रंगीत तालीमच आहे.

 -अच्युत कऱ्हाडकर, ग्रंथदिंडी आयोजक, श्री गणेश मंदिर संस्थान.