चित्रकार-शिल्पकारांचा अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्याशी संवाद

जगप्रसिद्ध शिल्पकार सदाशिव साठे यांच्या शिल्पालयात शनिवारी विख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचे शिल्प व चित्र अनेक कलाकारांनी साकारले. डोंबिवली औद्योगिक विभागात साठे यांचे शिल्पालय आहे. या शिल्पालयाचा शनिवारी दहावा वर्धापन दिन होता. या वर्धापन दिनानिमित्त एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
concrete road works Kalyan, Kalyan - Dombivli,
कल्याण – डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यांची कामे पावसापूर्वी पूर्ण करा, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेश
This pictorial story of Lalbagh Botanic Garden during both Bangalore and Bangalore eras
निर्जळगावातलं निसर्गबेट
Expansion of manufacturing companies in 14 cities due to spiritual tourism
आध्यात्मिक पर्यटनामुळे १४ शहरांत उत्पादक कंपन्यांचा विस्तार

कला या विषयाकडे तरुणांचा ओढा वाढला असला तरीही चित्रकला व शिल्पकला या कलेचा म्हणावा तसा प्रसार अजूनही झालेला नाही. त्यामुळे ही कला जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. साठे यांच्या शिल्पालयात काकोडकर यांचे शिल्प साकारण्याची संधी मिळणार असल्याने कल्याण डोंबिवलीतील कलाकारांनी शिल्पालयात एकच गर्दी केली होती. चित्रकार विजयराज बोधनकर, प्रभू कापसे, श्रीकांत कशेळकर, पळसुले देसाई, सुभाष शेगोकार, उमेश पांचाळ तसेच शिल्पकार सिद्धार्थ साठे, जयदीप आपटे, गुणेश अडवळ, नाशिकचे निलेश देरे यांनी यावेळी शिल्पालयात चित्र व शिल्प साकारले.

दोन मोठय़ा दिग्गजांसमोर आम्ही आमची कला सादर करत होतो हा आनंद वेगळाच होता. त्यातही डॉ. काकोडकर यांच्याशी गप्पा मारण्याची संधी मिळाली, तर भाऊंचे मार्गदर्शनही आम्हाला यावेळी लाभले. साठे शिल्पालयाच्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भविष्यात अशा कार्यक्रमांचे आयोजन केल्यास नव्या कलाकारांनाही प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळेल अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थित कलाकारांनी दिली.

जगविख्यात शिल्पकार साठे यांच्याच शिल्पालयात माझे चित्र व शिल्प अनेक कलाकार एकाच वेळी साकारत आहेत, यापेक्षा मोठा आनंद असूच शकत नाही. ही एक वेगळी आठवण माझ्या कायम स्मरणात राहील अशा शब्दात डॉ. काकोडकर यांनी भावना व्यक्त केल्या. साठे यांनी त्यांच्या कारकीर्दीतील काही आठवणी कलाकारांना सांगितल्या.  सर्व शिल्पे कलारसिकांना बघता यावीत, तसेच शालेय विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमात सहभागी व्हावे म्हणून अनेक उपक्रम भविष्यात आखण्यात येणार श्रीरंग साठे यांनी सांगितले.