कापुरबावडी उड्डाणपुलावर शनिवारी दुपारी एका भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वारही जखमी झाला आहे. घोडबंदर येथे राहणारे मिलिंद पांढरे आणि त्यांचा मित्र राकेश बोंदे (३५) हे दोघे शनिवारी दुपारी दुचाकीवरून मुलुंड चेकनाका परिसरात जात होते. कापुरबावडी उड्डाणपुलावर भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या धडकेत दोघेही दुचाकीवरून खाली पडल्यानंतर कंटेनर राकेशच्या अंगावरून गेल्याने त्यात राकेशचा जागीच मृत्यू झाला.