विक्रेत्यांचा पाडवा यंदा कोरडा; नोकरदार महिलांकडूनही मशीन वापराला टाटा

घरातील कामे पटापट आवरताना एकीकडे कपडे धुण्याची मशीन लावून महिला कार्यालय गाठण्याची कसरत करीत असतात. प्रत्येकाच्या घरात दररोज दिसणारे हे चित्र गेले काही महिने दिसत नाही. पाणी टंचाईमुळे कपडय़ांची मशीन घरात लावलीच जात नाही. यामुळे घरातील कपडे धुण्याची मशीन विसावा घेत आहे. तसेच दुकानातील वॉशिंग मशिन्सही विक्री रोडावली आहे. दुष्काळामुळे हे सावट ओढावल्याने विक्रेते चिंतेत आहे.
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याला बाजारपेठेत मोठी उलाढाल होते. प्रामुख्याने वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दागिने आणि वस्त्रप्रावरणांच्या बाजारात ही उलाढाल होताना दिसते. यंदाही व्यापारी पाडव्यासाठी सज्ज झाले असून दुकानदारांनी ग्राहकांसाठी काही आकर्षक खरेदीवर बक्षिसेही ठेवली आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून काही दुकानांमध्ये आगाऊ बुकींग सुरू झाले असले तरी त्याला फारसा प्रतिसाद नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
सर्वसाधारणपणे मशिनद्वारे कपडे धुण्यासाठी अधिक पाणी लागते. त्यामुळे पाणी बचत करण्याचे धोरण अवलंबत अनेकांनी मशिन्स वापरणे टाळले आहे. नव्या मशिन्स खरेदी करण्यातही निरूत्साह आहे. काही तुरळक ग्राहक मशिन खरेदी करीत असले तरी तेही स्वयंचलीत मशिन ऐवजी साध्या मशिनला प्राधान्य देत आहेत, असे विक्रेते खेमजी चावडीया यांनी सांगितले.
७० टक्क्य़ांनी विक्री मंदावली..
पाणी टंचाईचमुळे वॉशिंग मशीन खरेदीवर खुप मोठा परिणाम झाला आहे. ६० ते ७० टक्क्य़ांनी विक्री खाली आली आहे. गेल्यावर्षी साधारण आठशे ते हजार वॉशिंग मशीनची विक्री झाली होती, परंतू यंदा हीच विक्री दोनशे ते तीनशे वर आली आहे. याचबरोबर ऑनलाईन शॉपिंग व सध्या मोठय़ा मोठय़ा कंपन्यांच्या स्पर्धा आहे. पाडव्या निमित्त दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटी आमच्याकडे पंचवीस तीस ग्राहकांची तरी नोंद व्हायची मात्र यावर्षी अद्यापपर्यंत एकही नोंद झालेली नाही. त्यामानाने वातानुकूलीत यंत्राची मागणी वाढली आहे. असे अंबिका डिस्ट्रीब्युटर्स शोरुमचे कर्मचारी दिपक शिरोडकर यांनी सांगितले.

gold
पाडव्याला सुवर्णझळाळी योग; शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
Navi Mumbai, Gudipadwa
कडक उन्हात कडक उत्साह.. उन्हाची पर्वा न करता जोशात उत्साहात निघाली गुढीपाडवा स्वागत शोभायात्रा
trees Thane-Belapur industrial city
हरित पट्ट्याच्या मुळावर एमआयडीसी, २०० झाडांची कत्तल होणार, पर्यावरणवादी संस्थेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
Jagdamba Industry factory in Khamgaon MIDC caught fire
खामगाव ‘एमआयडीसी’मधील जगदंबा उद्योगाला भीषण आग; लाखोंचे नुकसान

यंदा आम्हाला कपडे धुण्याची मशीन घ्यायची होती. परंतू घरात केवळ एक दोन बादल्या पाणी येते, त्यात दररोज शंभर – दोनशे लीटर पाणी वाया घालवणे ठिक वाटत नाही. त्यामुळे यंदा कपडे धुण्याची मशीन खरेदी न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
– मनिषा कुऱ्हाडे, गृहिणी.

कामावर जाणाऱ्या महिलांसाठी केवळ रोजच्या वापरातले कपडे धुण्यासाठी ती ठिक आहे. यंदा पाण्याची कमतरता सगळ्यांनाच जाणवत आहे, अशात हे मशीन न वापरलेलेच बरे असे उत्तर सर्वच महिला देतील. त्यामुळे वॉशिंग मशीनची खरेदी न करण्याचे आम्ही ठरवले आहे.
– शर्वरी गोखले, नोकरदार महिला