महसूल विभागाच्या सर्वेक्षणात कल्याण तालुक्यात ६१, तर मुरबाड तालुक्यात ११८ कुटुंबे

कल्याण, मुरबाड परिसराचे झपाटय़ाने नागरीकरण होत आहे. नागरीकरणाचा हा वेग जबरदस्त असला तरी येथील आदिवासी पाडय़ांवर तसेच वस्त्यांमधून वास्तव्य करणाऱ्या कातकरी कुटुंबांचे स्वतंत्र्य सर्वेक्षण करण्यास जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे. या सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यात प्रशासनाला कल्याण तालुक्यात ६१ कातकरी कुटुंब आढळून आली असून त्यांची संख्या १ हजार ८१५ इतकी आहे. मुरबाडमध्ये ११८ कातकरी कुटुंब आहेत. तेथील कातकरी समाजाची लोकसंख्या ३ हजार २०० आहे. अशी एकूण ५०१५ कातकरी कुटुंब कल्याण, मुरबाड तालुक्यात राहत आहेत.

arun gawli marathi news, arun gawli jail marathi news
विश्लेषण: अरुण गवळीची सुटका होणार का? न्यायालयाने काय म्हटले? राज्य सरकारची भूमिका काय?
prashant bhushan
चार हजार कोटींच्या निवडणूक रोख्यांचा हिशेब नाही! प्रशांत भूषण यांचा दावा; एसआयटी चौकशीसाठी लवकरच याचिका
Recovery of 605 crores for house rent action of Zopu authority is shock to developers
घरभाड्यापोटी ६०५ कोटींची वसुली, ‘झोपु’ प्राधिकरणाच्या कारवाईचा विकासकांना धसका
Complaint to the Election Commission against Mahavitaran under jurisdiction of Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीसांच्या अखत्यारीत येणाऱ्या महावितरणविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार, जाणून घ्या कारण…

कल्याण, मुरबाड तालुक्यात महसूल विभागातर्फे २०२२ पर्यंत सामाजिक, नागरी, पायाभूत सुविधाविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी ‘संकल्प ते सिद्धी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणचे उपविभागीय अधिकारी प्रसाद उकार्डे, तहसीलदार अमित सानप, नायब तहसीलदार अभिजीत खोले व अन्य महसूल कर्मचाऱ्यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. कातकरी समाज मजूर, कष्टकरी आहे. आदिवासी, दुर्गम भागात वस्ती करून तो राहतो. मजुरीवर उपजीविका असल्याने ही कुटुंब जसे रोजगाराचे साधन उपलब्ध होईल त्या भागात वास्तव्य करून राहतात. त्यामुळे कातकरी समाजाची वस्ती एकाच ठिकाणी आढळून येत नाही. शिक्षण, व्यवसाय, समाजाच्या मुख्य प्रवाहापासून हा समाज दूर आहे. कातकरी समाजाला त्यांचे पारंपरिकपण सोडून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कातकरी उत्थान उपक्रम राबविण्यात येत आहे. या समाजाला शिक्षण, नागरी सुविधा, रोजगाराची साधने त्याच भागात उपलब्ध होतील या दृष्टीने महसूल विभाग सक्रिय झाला आहे. येत्या पाच वर्षांत कल्याण, मुरबाड तालुक्यांतील पाच हजार कातकरी कुटुंब एकाच जागी सुस्थितीत असतील अशा पद्धतीचे नियोजन महसूल विभागाने भविष्यवेध उपक्रमांतर्गत केले आहे, अशी माहिती नायब तहसीलदार अभिजीत खोले यांनी दिली.

सोळा सेवा ऑनलाइन

महसूल कार्यालयातून रहिवाशांना उत्पन्न, जात, अधिवास, ज्येष्ठ नागरिक अशा अनेक प्रकारच्या सोळा प्रकारच्या सेवा-सुविधा दिल्या जातात.

सध्या सेतू, महा ई सेवा केंद्रांमधून ही सुविधा दिली जात आहे. या सेवा घेताना रहिवाशांना तहसील कार्यालयात यावे लागू नये याचे नियोजन केले जात आहे.

यासाठी येत्या पाच वर्षांत रहिवाशांना बहुतांश सुविधा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. रहिवाशाने ऑनलाइन पद्धतीने त्याला आवश्यक दाखल्याचा विहित अर्ज भरला की त्याला ऑनलाइन पद्धतीने तो दाखला उपलब्ध होईल, अशी व्यवस्था येत्या पाच वर्षांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे खोले यांनी स्पष्ट केले.

तीन लाख सातबारे ऑनलाइन

कल्याण तालुक्यात १२५ गावे आहेत. या गावांमधील ४२ गावांना ऑनलाइन पद्धतीने सातबारा उतारा काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुरबाड तालुक्यात २०५ गावे आहेत. या गावांमधील ४५ गावांना आनलाइन सातबारा उतारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. येत्या तीन महिन्यांत उर्वरित गावांना सातबारा उतारा ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. कल्याण तालुक्यात एकूण ४ लाख २६ हजार ३८० जमिनीचे खातेदार आहेत. यामधील २ लाख ९६ हजार ४८३ सातबारा उताऱ्यांची डिजीटल नोंदणी करण्यात आली आहे. ९९ हजार २०५ फेरफार नोंद करण्यात आले आहेत. १३ इनामपत्र, ३२३ हक्क देणी व ६२७९ गाव नमुना १४ डिजीटल पद्धतीने नोंदविण्यात आले आहेत. सर्व जमीन व्यवहार, कागदपत्रांची माहिती शेतकरी, जमीन मालकांना ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची सुविधा येत्या पाच वर्षांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे खोले यांनी सांगितले.