अंबरनाथजवळील चिखलोली आणि रेल्वेच्या अखत्यारित असलेले जीआयपी धरणांचे संवर्धन तातडीने होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत डॉ. मनीषा कर्पे यांनी व्यक्त केले. गजानन महाराज सेवा मंडळातर्फे देण्यात येणारा पर्यावरणस्नेही पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्या वेळी त्यांनी हे मत मांडले होते.
डॉ. माहेश्वरी शरण, डॉ. माधवी शरण आणि ‘ग्रंथसखा’चे श्याम जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी अंबरनाथ शहरातील मान्यवर उपस्थित होते. रेल्वेच्या अखत्यारीतील जीआयपी धरणांकडे पूर्णत: दुर्लक्ष झालेले आहे. या परिसरात मुबलक हिरवाई असून निसर्गाने फुललेला हा परिसर आहे. परंतु येथे मोठय़ा प्रमाणावर वृक्षतोड होत असून या धरणाच्या जलसाठय़ाचा परिसर हा ओसाड झाला आहे; तसेच औद्योगिक क्षेत्राकडून होणाऱ्या रासायनिक प्रदूषणामुळे या जलसाठय़ाचे प्रदूषण होत असल्याचे कर्पे म्हणाल्या.