उल्हास नदी पात्रातील जलपर्णीमुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेला नदी पात्रातून पाणी उपसा करण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस कल्याण- डोंबिवली परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

ठाणे जिल्ह्य़ात शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे उल्हास नदी दुथडी भरून वाहत होती. या वेळी उल्हास नदी पात्रात मोठय़ा प्रमाणात साचलेली जलपर्णी ही पाण्याच्या प्रवाहात वाहून आल्याने नदी पात्रातून पाणी उपसा करण्यास अडथळा निर्माण झाला आहे.

यामुळे पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. नागरिकांनी योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.