ठाण्यातील ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत युवाशक्तीच्या उत्साहाला उधाण

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची ठाणे विभागीय अंतिम फेरी गुरुवारी संध्याकाळी मोठय़ा उत्साहात पार पडली. ठाणेकर रसिकांनी मोठय़ा संख्येने हजेरी लावत तरुण रंगकर्मीच्या सादरीकरणाला मनापासून दाद दिली. त्यात तरुणांची संख्या लक्षणीय होती. या अंतिम फेरीची ही झलक..

pune mba cet marathi news, mca cet marathi news
आणखी दोन अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटीद्वारे, अर्ज नोंदणीसाठी १८ एप्रिलपर्यंत मुदत
New Year Welcome Kalyan,
कल्याण, डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रांचा उत्साह; ढोल ताशांचा गजर, कलाकारांची उपस्थिती
supriya sule interview
बारामतीत ‘पवार विरुद्ध पवार’ सामना; सुप्रिया सुळेंसमोरील आव्हान मात्र वेगळंच
mumbai passengers marathi news, local train marathi news
सुट्टीकालीन लोकल वेळापत्रकाने प्रवासी हैराण, गुड फ्रायडेच्या दिवशी लोकलचा खोळंबा

सादर झालेल्या एकांकिका..

१) विवा महाविद्यालय, विरार – दिल-ए-नादान

२) बिर्ला महाविद्यालय, कल्याण – हंगर आर्टिस्ट

३) जोशी-बेडेकर महाविद्यालय, ठाणे – असणं-नसणं

४) सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे – रात्रीस खेळ चाले

५) एमकॉस्ट महाविद्यालय, ठाणे – मजार

अंतिम फेरी निकाल, ठाणे

१) सवरेत्कृष्ट एकांकिका  – असणं-नसणं

२) द्वितीय – दिल-ए-नादान

३) तृतीय – मजार

युवाशक्तीने उत्साहपूर्ण कला सादर केली. सध्याच्या काळातील युवकांचे भावविश्व साकारण्याबरोबरच सामाजिक विषयांची हाताळणी या स्पर्धेत पाहायला मिळाली. नव्या पिढीच्या सर्जनशीलतेचे दर्शन या निमित्ताने घडले. व्यावसायिक नाटकांच्या तोडीस तोड एकांकिका या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळाल्या. याच विषयांमधून रंगभूमीला नवे विषय मिळू शकणार आहेत. कदाचित यातीलच चांगले, दुर्मीळ आणि लक्षात राहणाऱ्या एकांकिका रसिकांना व्यावसायिक रंगभूमीवरही पाहता येऊ शकणार आहे. नव्या रंगकर्मीच्या कलाविष्काराने उत्तरोत्तर रंगत जाणारी ही स्पर्धा रसिकांना आणि नाटय़प्रेमींना आनंद देणारी अशीच आहे.

– नकुल घाणेकर, अभिनेता

लोकसत्ता म्हणजे दर्जेदार आणि चांगले असे समीकरण असून एकांकिका स्पर्धेच्या निमित्तानेही हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. नवे विषय, नव्या संहिता, कलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि नेपथ्यकार या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळतात आणि त्यातूनच त्याची कला सिद्ध होते. असे उपक्रम वारंवार व्हायला हवेत. लोकांकिकाच्या माध्यमातून नवीन पिढीला चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

– प्राजक्ता आपटे, नृत्यांगना

‘लोकसत्ता लोकांकिका’ हा उपक्रम अतिशय चांगला आहे. शिस्तबद्ध पद्धतीने याचे नियोजन केले गेले आहे. कुठेही वेळ वाया न घालवता एकामागोमाग एक असे प्रयोगाचे सादरीकरण झाल्याने तिष्ठत बसावे लागत नव्हते. अशा स्पर्धा भरविल्याने नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होते. या स्पर्धेत मुलांनी आणखी वेगवेगळे विषय मांडणे अपेक्षित असते. ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या निमित्ताने ते पाहवयास मिळाले.

– राजन जोशी, अभिनेते

अतिशय अप्रतिम विषयांची मांडणी आणि तितक्याच ताक दीने केलेला अभिनय हे पाहून थक्क होण्याखेरीज आपल्या हातात काही राहत नाही. प्रत्येकाच्या अभिनायची समज नव्या पिढीने आत्मसात केली आहे. ‘लोकसत्ता’ने या लोकांकिकांमधून उद्याचे स्टार घडविण्याची कार्यशाळा सुरू केली आहे. हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे.

– संतोष राणे, प्राध्यापक

नव्या रंगकर्मीच्या प्रयोगांना चांगले व्यासपीठ ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या निमित्ताने तरुणांना उपलब्ध करून दिली आहे. त्यांनी या संधीचे सोने करावे. विविध स्पर्धामधून भाग घ्यावा. त्यामुळे सादरीकरणात सफाई येते. आत्मविश्वास वाढतो आणि विशेष म्हणजे खिलाडूवृत्ती जागृत होते. त्यातून व्यावसायिक रंगभूमीकडे तुमची वाटचाल सुरू होईल. पारितोषिक मिळणे न मिळणे हा दुय्यम भाग असतो; मात्र स्पर्धेतून शिकता येते. ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वच लोकांकिका उत्तम होत्या. अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश योजना, विषयाची मांडणी आणि लेखन या सर्वच बाबतीत विद्यार्थ्यांनी दाखविलेला प्रगल्भपणा वाखाणण्याजोगा होता.

– अरुण नलावडे, अभिनेते

‘लोकसत्ता लोकांकिका’मधून वेगवेगळे विषय हाताळले गेले. नवे विषय वेगळ्या दृष्टिकोनातून मांडण्यात आले. पूर्व तयारीनिशी विषयाला भिडल्याचे जाणवले; मात्र चटपटीतपणापलीकडे जाण्याचा प्रयत्न होण्याची गरज आहे. तांत्रिक वापर मर्यादित असला तरी त्यात सर्जनशीलता हवी. नेपथ्य आणि प्रकाश योजनेत कल्पकता असायला हवी.

– शफाअत खान, लेखक -दिग्दर्शक

वैयक्तिक पारितोषिके

१) सवरेत्कृष्ट दिग्दर्शक – पवन ठाकरे/सुशांत पाटील (असणं-नसणं)

२) सवरेत्कृष्ट लेखन – श्रेयस राजे (असणं-नसणं)

३) सवरेत्कृष्ट अभिनय – विशाल चव्हाण (भूमिका-अनंता, असणं-नसणं)

४) सवरेत्कृष्ट अभिनय – निकिता घाग (भूमिका – कृतिका, रात्रीस खेळ चाले)

५) सवरेत्कृष्ट प्रकाश योजना – महेश सापणे (दिल-ए-नादान)

६) सवरेत्कृष्ट नेपथ्य – मयुर मांडवकर (मजार)

७) सवरेत्कृष्ट संगीत – योगेश बाद्रे/प्रथमेश कासुर्डे (मजार)

प्रायोजक : ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘केसरी’, ‘क्रिएटिव्ह अकॅडमी, पुणे’ व ‘झी युवा’ यांच्या सहकार्याने झालेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन स्पर्धेची महाअंतिम फेरी ‘झी युवा’ या वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे. ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे टॅलेण्ट पार्टनर आहेत, तर ‘अस्तित्व’ या संस्थेची या स्पर्धेसाठी मदत होत आहे.