विजेत्यांचा जल्लोष, उपस्थितांकडून होणारा टाळय़ांचा कडकडाट आणि मान्यवरांची मांदियाळी अशा उत्साहवर्धक वातावरणात ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’च्या दुसऱ्या पर्वाची सांगता झाली. ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली या परिसरांतील दुकानांतून खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या फेस्टिव्हलमध्ये कल्याणचे साईदत्त खातू यांनी कार पटकावण्याचा मान मिळवला, तर कांजूरमार्गच्या नम्रता मुजुमदार यांना वीणा वर्ल्डच्या सिंगापूर सहलीच्या रूपात दुसरे पारितोषिक मिळाले.
ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगरसारख्या मोठय़ा शहरांमध्ये २५० हून अधिक गृहोपयोगी वस्तूंच्या शो रूम्सच्या सहभागाने २१ दिवस रंगलेल्या शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये २५ हजार वाचकांनी सहभाग नोंदवला. या महोत्सवाचा अखेरचा बक्षीस वितरणाचा सोहळा गुरुवारी ‘ठाणे क्लब’च्या हॉलमध्ये पार पडला. आघाडीचा मराठी अभिनेता संतोष जुवेकर याच्यासह मोहन ग्रुपच्या बरखा इंदर, वीणा वर्ल्डच्या सुनीला पाटील, सॉफ्ट कॉर्नरचे राकेश भोईटे आणि राहुल पाटणकर,

‘लोकसत्ता’कडून अमूल्य भेट
tv07आम्ही नित्यनियमाने ‘लोकसत्ता’ वाचतो. गेले काही दिवस आपल्या वृत्तपत्रातून काही विजेत्यांना बक्षीस मिळाल्याचे वाचनात आले; परंतु त्यामध्ये आपणही असू याची कल्पनाच केली नव्हती. ‘लोकसत्ता’कडून बक्षीस म्हणून एखादे पेन जरी मिळाले असते तरीही मला आनंद झाला असता. ‘लोकसत्ता’मध्ये फोटो येणार याचाच आम्हाला खूप आनंद आहे. कार बक्षीस म्हणून मिळणे म्हणजे स्वप्नपूर्ती होणे. त्याबद्दल ‘लोकसत्ता’चे खूप खूप आभार.
साईदत्त खातू, कार विजेते

बहिणीच्या साडीमुळे ‘परदेशवारी’
ठाण्याच्या कलामंदिर दुकानात बहिणीसाठी साडी खरेदी करून ठेवली होती. मात्र त्या दिवशी घाई-गडबडीत ‘लोकसत्ता शॉपिंग फेस्टिव्हल’चे कूपन भरायचे राहून गेले. दुसऱ्या दिवशी साडी ताब्यात घ्यायला दुकानात गेले, तेव्हा कलामंदिरच्या दुकानदारांनी मला आदल्या दिवशी न भरलेल्या कूपनची आठवण करून दिली. तेव्हा मी कूपन भरले. कामाच्या गडबडीत विसरून पण गेले. अचानक ‘लोकसत्ता शॉपिंग फेस्टिव्हल’कडून तुम्ही विजेते झाल्याचा फोन आला. खरे तर यावर माझा विश्वासच बसेना. असे आपण कधी विजेते होऊ  असे स्वप्नातही वाटले नव्हते.      
– नम्रता मुजुमदार, कांजूरमार्ग.
 (वीणा वर्ल्डच्या परदेशवारीच्या विजेत्या)

या उपक्रमात तसा योगायोगानेच सहभागी होऊ शकलो. कारण पत्नीसोबत खरेदी करीत असताना फक्त बिल भरण्यासाठी म्हणून काऊंटरवर गेलो आणि ‘लोकसत्ता शॉपिंग फेस्टिव्हल’चे कूपन भरले. त्यामुळे खरी विजेती माझी पत्नीच आहे. बक्षीस काय मिळणार यापेक्षाही ‘लोकसत्ता’तर्फे  बक्षीस मिळणार याचाच आनंद जास्त होता.             
– प्रसाद तिरोडकर,   महिंद्रा गस्टो विजेते

खरेदी हा महिलांचा सर्वाधिक आवडता विषय असून विंडो शॉपिंगमध्ये पण महिला रमतात. ‘लोकसत्ता शॉपिंग फेस्टिव्हल’च्या माध्यमातून महिलांनी खरेदीसोबत बक्षीस जिंकण्याचासुद्धा आनंद लुटला. ‘लोकसत्ता शॉपिंग फेस्टिव्हल’ने नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच त्यांच्या वाचकांना विजेते होण्याची संधी दिली. हा अतिशय चांगला उपक्रम होता. वीणा वर्ल्डकडून विजेत्यांच्या घरातील दोन व्यक्तींना ‘परदेशवारी’चा अनुभव घेता येणार आहे. ही निश्चितच आनंदाची बाब आहे. सर्व विजेत्यांचे खूप खूप आभार.
– सुनीला पाटील, वीणा वर्ल्ड  

‘लोकसत्ता’ मी बरीच वर्षे वाचतो. मी मूळचा ठाणेकर असल्याने या शहराला अधोरेखित करून आपण जे काही उपक्रम करता, त्याचे मला मनापासून कौतुक करावेसे वाटते. शॉपिंग करून बक्षीस मिळणे म्हणजे सुवर्णलाभ होणे. या उपक्रमातून तो झालाच आहे. बक्षिसे घेणाऱ्यांइतकाच आनंद मला बक्षीस देताना झाला आहे. वाचकांना जोडणारे उपक्रम आपण कायम असेच सुरू ठेवावेत.
– संतोष जुवेकर, अभिनेता

विजेत्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खरेच समाधान वाटले. हा आनंद फक्त ‘लोकसत्ता’मुळेच शक्य झाला आहे. अशा स्तुत्य उपक्रमामध्ये आम्ही नेहमीच सहभागी होऊ. ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’मुळे फक्त विजेत्यांनाच नाही तर आम्हा प्रायोजकांनाही तितकाच फायदा झाला आहे.
– स्नेहा राणे, मल्हार डेकॉर

‘लोकसत्ता’मुळे अशा दर्जेदार उपक्रमाचा एक भाग होता आले त्याबद्दल धन्यवाद. विजेत्यांना बक्षिसे देताना खूप आनंद झाला. अशा उपक्रमांसाठी आम्ही कायम आपल्या सोबत राहू.
बरखा इंदर, मोहन ग्रुप

‘लोकसत्ता’ हे वृत्तपत्र माझ्या कुटुंबातील सर्वाचेच आवडीचे वृत्तपत्र. मी तरुण होतो तेव्हा शेवटचे क्रीडा पान वाचायचो, आता थोडे मध्यम वयात आल्यापासून मधले पान वाचतो. वयासोबत आवडी बदलत गेल्या; परंतु ‘लोकसत्ता’ त्या सर्व आवडींची पूर्तता नेहमीच करीत आले आहे. ‘लोकसत्ता’कडून मिळालेल्या या बक्षिसाचा मला खूप आनंद होत आहे. हा एल.ई.डी. टीव्ही मी माझ्या दवाखान्यात लावून, माझा हा आनंद मी माझ्या रुग्णांसोबत वाटणार आहे.
डॉ. रवी गांगल, एलईडी टीव्ही विजेते.

विजेते
’मोहन ग्रुपकडून कार विजेते – साईदत्त खातू, कल्याण<br />’वीणा वर्ल्डकडून सिंगापूर टूर – नम्रता मुजुमदार, कांजूरमार्ग
’महिंद्रा गस्टो – प्रसाद तिरोडकर
२३ इंची एलईडी
’शामल दुर्वे, ठाणे
’स्नेहल कदम, ठाणे
’श्रद्धा मोघे, ठाणे
’सत्यसुशीला कांबळे, चेंबूर
’२९ इंची एलईडी विजेते
’डॉ. रवी गांगल, ठाणे
’अर्चना गुजरे, ठाणे
’पूनम सोनावणे, कोपरी
’किशोर रावराणे, डोंबिवली
’पुष्पांजली सुळे, कल्याण
मोबाइल संच
’सुनील माणके, ठाणे
’अनिता प्रधान, ठाणे
’अमित पवार, कल्याण
’मानसी लांबोळे, डोंबिवली
’हरिश्चंद्र शेळके
पारितोषिक प्रायोजक
’मोहन ग्रुपकडून कार
’वीणा वल्र्डकडून परदेशी सहल
’महिद्राकडून गस्टो स्कूटर
’वामन हरी पेठे सन्स, ठाणेकडून सोन्याची राजमुद्रा
’कलानिधी- ठाणेकडून पैठणी
’अंकुर ज्वेलर्सकडून चांदीचे बिस्कीट
’जैन ट्रेडर्सकडून टीव्ही आणि मॅक इलेक्ट्रानिक्सकडून मोबाइल