चाळीसवर्षीय पित्याने पंधरा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना काशिमीरा येथे उघडकीस आली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्या पत्नीचे वर्षभरापूर्वीच निधन झाले. तो आपल्या दोन मुलांसमवेत काशिमीरा येथे राहतो. नववीत शिकणाऱ्या आपल्या मुलीवर त्याने अनेकदा लैंगिक अत्याचार केले. तिने धैर्य एकवटून ही गोष्ट जवळच्या नातेवाईकाला सांगितल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. या नातेवाईकांनी तातडीने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली.