मुंब्रा येथील कौसा भागात गुरुवारी दुपारी साडेतीन वर्षीय हमदन खान या मुलाचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना घडली असून प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
कौसा येथील शादी महल भागातील नीलकमल इमारतीमध्ये हमदनचे नातेवाईक रहात असून तो आईवडिलांसोबत त्यांच्या घरी आला होता. गुरुवारी दुपारी तो घराबाहेर खेळत असताना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला.
यामध्ये गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला मुंब्य्रातील काळसेकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला पुढील उपचाराकरिता मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले आहे, अशी माहिती काळसेकर रुग्णालय प्रशासनाने दिली.