शहरातील १५० एकर क्षेत्र वनाखाली; तालुक्यात चार हजार हेक्टरवर वनीकरण

राज्यात नव्याने आलेल्या सरकारने दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला. मात्र अनेक ठिकाणी त्याचे सोपस्कारच पार पाडले गेल्याचे समोर आले होते. मात्र वर्षभरानंतर अंबरनाथ तालुक्यात याचे चांगले परिणाम आता दिसू लागले असून एकटय़ा अंबरनाथ शहरात वर्षभरात जवळपास दीडशे एकर क्षेत्र वनाखाली आले आहे. संपूर्ण अंबरनाथ तालुक्यात आणि बारवीच्या जंगलात चार हजार हेक्टर क्षेत्रावर वनराई फुलते आहे. त्यामुळे अंबरनाथ तालुक्यात नवे जंगल उभे राहते आहे.

Accused who absconded after killing arrested after 34 years
हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; गुन्हे शाखा १ ची कारवाई
survey of disabled in maharashtra,
राज्यात अपंगांच्या सर्वेक्षणाला तीस वर्षांनंतर मिळाला मुहूर्त
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
380 crore fraud case
३८० कोटी फसवणूक प्रकरण : आरोपीचा तीन राज्यांमध्ये १२ दिवस पाठलाग, अखेर उत्तराखंड येथून अटक

गेल्या वर्षी जुलै महिन्यात राज्यभर शासनाच्या वतीने दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प सोडण्यात आला होता. सर्वच शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था अशा सर्वाना यात सहभागी करून घेण्यात आले होते. मात्र अनेक संस्थांनी याबाबतीत फक्त सोपस्कार पाड पाडले. मात्र अंबरनाथ तालुक्यात यावर स्थानिक वन विभाग आणि पर्यावरणप्रेमींच्या प्रयत्नांनी मोठे क्षेत्र वनलागवडीखाली आले असून एकटय़ा अंबरनाथ शहरात तब्बल दीडशे एकर क्षेत्रावर यशस्वी रोपण करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत अंबरनाथकरांना स्वच्छ आणि मोकळ्या हवेत श्वास घेणे सोपे होणार आहे. अंबरनाथ शहरातील जावसई, खुंटवली या भागात वन विभागाने गेल्या वर्षी हजारोंच्या संख्येने रोपे लावली होती.  जावसईमध्ये ५३ हजार ७५० रोपांची लागवड करण्यात आली. त्यातील तब्बल ९५ टक्के  रोपे जगली असून ५१ हजारांपेक्षा अधिक रोपे जगल्याचा अहवालही सादर करण्यात आला आहे. येत्या वर्षांत येथेच आणखी २५ हजार झाडांचे रोपण करण्यात येणार आहे. त्याच्याच शेजारी असलेल्या खुंटवली भागात यंदा ५० हजार खड्डे तयार असून त्यासाठी रोपेही तयार करण्यात आली आहेत. पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर काही दिवसांतच याचे रोपण करण्यात येणार असल्याची माहिती क्षेत्रीय वनपाल चंद्रकांत शेळके यांनी दिली आहे. नुकतीच वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारणे यांनीही या यशस्वी प्रयोगाला प्रत्यक्ष भेट देऊन वन विभागाचे कौतुक केले होते. त्यामुळे येत्या काही वर्षांत अंबरनाथ शहराशेजारील मोठे क्षेत्र वनाखाली येणार आहे. याचा फायदा निश्चितच शहराच्या शुद्ध हवेसाठी होणार असून प्रदूषण नियंत्रणासाठीही हे फायदेशीर ठरणार आहे.

दीड लाख खड्डे तयार

येत्या जून-जुलै महिन्यातही दीड लाख झाडांचे रोपण करण्याचे नियोजन असून त्यासाठी अंबरनाथ तालुक्यातील विविध ठिकाणी खड्डे खोदून तयार आहेत. तसेच दापिवली येथील रोप तयार करण्याच्या केंद्रात तीन लाखांहून अधिक रोपे तयार करण्यात आले असून खासगीरीत्या मागणी आल्यास त्यांनाही रोपे देण्याची तयारी वन विभागाने केली आहे.

ग्रामीण भागात वनीकरण

अंबरनाथ शहरासोबतच तालुक्यातील विविध गावांमध्येही वनविभागाने मोठय़ा प्रमाणावर रोपांची लागवड केली आहे. यात पाचोण, राहटोली, चरगाव, येवे, कारंद अशा गावांमध्ये ९३ हजार ५०० रोपांची लागवड करण्यात आली होती. त्यातील जवळपास ८८ हजार झाडे जगली आहेत. त्यामुळे शहरासोबतच ग्रामीण भागातही मोठय़ा प्रमाणावर वनीकरण झाले आहे. त्यात बारवी क्षेत्रातही मोठय़ा प्रमाणवर संगोपनात यश आल्याचे शेळके यांनी सांगितले आहे.

अंबरनाथमध्ये १५० एकर  क्षेत्रात वृक्षलागवड करण्यात आली आहे.