ठाणे जिल्हय़ाच्या ग्रामीण भागात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. मात्र प्रसिद्धीअभावी त्यांची माहिती कमी जणांनाच असते. नुकताच कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झालेल्या निळजे गावातील निसर्गरम्य तलाव हा त्यापैकीच एक. कल्याण ग्रामीण भागातील मुख्य जलस्रोत असलेला हा तलाव म्हणजे या गावाचे वैभवच!
गेल्या वर्षी स्थानिक प्रशासनाने या तलावाला नवसंजीवनी दिल्याने तलावाच्या निसर्गरम्यतेआणखी भर पडली आहे. चहुबाजूने नटलेली हिरवाई, आकर्षक पदपथ, रमणीय उद्यान आणि रात्रीची रोषणाई यांमुळे तलावाचे सौंदर्य आणखीनच वाढलेले आहे.
कल्याण-शिळ रोडवर बदलापूर बायपासच्या पुढे निळजे गाव लागते. गावाच्या वेशीवरील कमानच या गावाचा मार्ग दाखवते. या कमानीपासून पाच मिनिटे अंतरावर हा आकर्षक तलाव आहे. या तलावाचे पूर्वीचे नाव होते बोराला तलाव. पण आता त्याचे नामकरण करून संत ज्ञानेश्वर माऊली तलाव असे करण्यात आले आहे. तलावाचा आकार प्रचंड मोठा आहे. तलावाच्या चहुबाजूने विविध प्रकारची फुलझाडे व फळझाडे लावण्यात आली आहेत. त्यामुळे तलावाचे सौंदर्य आणखीनच खुलून येते.
दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद प्रशासनाने या तलावाचे सुशोभीकरण केले. हा तलाव प्रेक्षणीय स्थळ व्हावे आणि फिरस्त्यांनी त्याला भेट द्यावी यासाठी तलावाच्या सौंदर्यीकरणात वाढ करण्यात आली. तलावाच्या बाजूला आकर्षक उद्यान तयार करण्यात आले. या उद्यानात विविध खेळांची साधने ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर घटकाभर विसावा घेण्यासाठी पत्र्याची शेड टाकून एक निवारा मंडप तयार करण्यात आला आहे. या निवारा शेडमध्ये बसून तलावातील पक्षी आणि आकर्षक कमळफुले न्याहाळण्यात एक वेगळाच आनंद आहे.
तलावाच्या एका बाजूला ज्येष्ठ नागरिकांसाठी एकमजली ज्येष्ठ नागरिक भवन तयार करण्यात आले आहे. त्यात ग्रंथालय, मनोरंजन केंद्र व ध्यानकेंद्राचा समावेश आहे. तलावाच्या बाजूलाच वेताळेश्वर मंदिर असून तलावाकाठील या मंदिरामुळे तलावाचे सौंदर्य आणखी वाढविते.

माऊली तलाव, निळजे.
कसे जाल? : कल्याण-शिळ मार्गावर निळजे गावात जाण्यासाठी फाटा आहे. कल्याण व डोंबिवलीहून वाशी, बेलापूर, पनवेलला जाणाऱ्या बस येथे थांबतात. या फाटय़ावरून पाच मिनिटांवर निळजे तलाव आहे.

Sangli, Citizens Rescue Crocodile, Hand Over to Forest Department, crocodile in sangli, crocodile in human area, crocodile in sangli, Rescue crocodile, crocodile Rescue,
सांगली : नागरी वस्तीत आलेल्या मगरीची नैसर्गिक अधिवासात पाठवणी
Relief for flood affected Chirner due to works started before monsoon
पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या कामांमुळे पूरग्रस्त चिरनेरला दिलासा?
Pimpri, police died, police hit by vehicle,
पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू
life of fish, fish in river, fish danger,
नदी, तलावातील माशांचे आयुष्य का धोक्यात आलंय? काय आहे नवं संशोधन?

रंगीबेरंगी पक्षी
निळजे तलाव प्रसिद्ध आहे पक्षीनिरीक्षणासाठी. अनेक आकर्षक व विविध रंगांचे पक्षी या तलावात आढळतात. त्यामध्ये पाणकोंबडा, ब्राह्मणीय डक, जॅकेन्स, मूरहेन्स, कॅटल इग्रेट आदी पक्ष्यांचा समावेश आहे.