फटाक्यांपासून कपडय़ांपर्यंतच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीची चाहूल लागताच वसईच्या रस्त्यावरील बाजार फुलू लागला असून ऑक्टोबरचा पगार हाती पडताच नागरिकांची पावले बाजाराकडे वळू लागली असून कपडे, फटाके, वस्तू, रांगोळय़ा खरेदी करण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. त्यातच महापालिकेसह विविध संस्थांनी दिवाळीनिमित्त खास बाजारपेठेचे आयोजन केले असल्याने ग्राहकांसाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत.
दिवाळीच्या निमित्ताने आकाशकंदील, शोभेच्या वस्तू, पणत्या, रांगोळ्या वसईच्या रस्त्यावर दिसू लागल्या आहेत. मोसमानुसार साहित्यांच्यी विक्री करणाऱ्या दुकानदारांनी आपापल्या दुकानात दिवाळीचे विविध साहित्य विक्रीसाठी ठेवले आहेत. यंदाही चिनी वस्तूंनी दिवाळीची बाजारपेठ काबीज केलीे आहे. अनेक चिेनी बनावटीच्या शोभेच्या वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत. त्यात आकाशकंदील, पणत्या, विद्युत रोषणाईचे दिवे आणि इतर शोभिवंत वस्तूंचा समावेश आहे.
सध्या बाजारात ग्राहकांची गर्दी होत असली तरी शनिवारी आणि रविवारी खरेदीचा जोर आणखी वाढेल, असे रमणिक जैन या विक्रेत्याने सांगितले. ग्राहकांचीे गरज लक्षात घेऊन स्वयंसेवीे संस्था तसेच महापालिकेच्या वतीेने शहरात विविध ठिकाणीे दिवाळी बाजारपेठेचे आयोजन केले आहेत. काही बाजारपेठा सुरू झाल्या असून उर्वरित बाजारपेठा शनिवारपासून सुरू होणार आहेत. पालिकेच्या महिला व बालकल्याण समितिच्या वतीेने स्वयंमहिला उद्योजक, बचत गट आणि इतर संस्थांच्या मदतीेने या बाजारपेठा भरविल्या जात आहेत. तेथे रास्त भावात ग्राहकांना विविध वस्तू उपलब्ध करून दिल्या जात आहेत.