महावितरण कंपनीच्या ठाणे नागरी विभाग – २ च्या कार्यक्षेत्रातील वीज वाहिनींचे देखभाल व दुरुस्तीचे काम शुक्रवार ६ नोव्हेंबर रोजी हाती घेण्यात येणार असल्यामुळे ठाणे शहरातील काही भागांचा वीजपुरवठा सकाळी १० ते ५ या वेळात बंद राहणार आहे.
कळवा या वीज वाहिनीवरील गणपती पाडा, फुलेनगर, ईश्वरनगर, आनंद नगर, वाघोबानगर, भोलानगर, शिवाजीनगर, सम्राट अशोकनगर, ठाकुरपाडा, मफतलाल कॉलनी, शांतिनगर, गोपालरावनगर, व खारेगाव या
वीज वाहिनीवरून वीजपुरवठा केल्या जाणाऱ्या जुना मुंबई पुणे रस्ता, खारेगांव, पाखाडी, शिवसेना शाखा खारेगांव, मैत्री वाटिका, रेतीबंदर, वास्तुआनंद, रघुकुल को. ऑप. हौ. सोसायटी, आझोन व्हॅली, सांघवी व्हॅली, रेतीबंदर आदी परिसरातील वीजपुरवठा खंडित राहणार आहे, अशी माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली आहे.