ठाणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; मिळकतधारकांना कराची बिले पोहचण्यास विलंब

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Why Are performing satisfactorily mutual funds Rates So Low A Performance Analysis
समाधानकारक कामगिरी करणाऱ्या म्युच्युअल फंडांची संख्या इतकी कमी कशी?
bank of Maharashtra loan disbursement increased by 16 percent
‘महाबँके’च्या कर्ज वितरणात १६ टक्क्यांची वाढ
fraud of 44 lakh with investors in Dombivli by giving lure of increased interest
वाढीव व्याजाच्या आमिषाने डोंबिवलीतील गुंतवणूकदारांची ४४ लाखाची फसवणूक

मुदतीपेक्षा आधी मालमत्ता कर भरणाऱ्या ठाणेकरांवर महापालिकेकडून एकीकडे सवलतींचा वर्षांव केला जात असला तरी मालमत्ताकराची बिले ठाणेकरांना वेळेवर मिळतील याची महापालिकेतील संबंधित यंत्रणांनाच खात्री नसल्याचे चित्र आहे. बिलांची संख्या तसेच भौगोलिक परिस्थिती पाहता मिळकतधारकांना बिले पोहचण्यास अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सवलती मिळवायच्या असतील तर ठाणेकरांनी संबंधित प्रभाग कार्यालयात संपर्क साधून कराची प्रत प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. शहरात कोटय़वधी रुपयांच्या विकासकामांच्या घोषणा करत निविदा प्रक्रियांमध्ये व्यग्र असलेल्या अधिकाऱ्यांना नागरिकांना वेळेवर बिले पाठवण्याची यंत्रणा अद्याप विकसित करता आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यंदाचा अर्थसंकल्प मांडताना ठाणेकरांच्या मालमत्ताकरात अंशत: वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेत असताना वेळेत आणि मुदतीआधी कर भरणा करणाऱ्या ठाणेकरांना करात सवलत दिली जाईल, अशी घोषणा जयस्वाल यांनी केली. त्यानुसार ३१ मेपर्यंत मालमत्ताकराचा भरणा केल्यास एकूण करात १० टक्के सवलत दिली जाणार आहे.

याशिवाय १ जून ते ३० जूनपर्यंत कराचा भरणा केल्यास चार टक्के, १ जुलै ते ३१ जुलैपर्यंत तीन टक्के तर ३१ ऑगस्टपर्यंत करभरणा केल्यास दोन टक्क्यांची सवलत दिली जाणार आहे. ३१ मेपर्यंत करभरणा केल्यास १० टक्क्यांची घसघशीत सवलत मिळणार असल्याने वेळेत कर भरून सवलत मिळवण्यासाठी बहुतांश ठाणेकर आग्रही आहेत. मात्र, सवलतींची घोषणा करणाऱ्या महापालिकेस अद्याप कराची बिले पाठविण्यात यश मिळाले नसल्याने बिलेच नाहीत तर कर भरायचा तरी कसा, असा प्रश्न ठाणेकरांना पडला आहे. मध्यंतरी पोस्टाने कराची बिले पाठवण्याचा प्रयोग ठाणे महापालिकेने करून पाहिला. मात्र, त्यात यश मिळाले नसल्याने पुन्हा कर्मचाऱ्यांद्वारे कर बिले पाठवली जाणार आहेत. मात्र, ३१ मेपर्यंतची सवलत मिळवण्यास आतुर असलेल्या ठाणेकरांना महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या ढिसाळ कारभाराचा पुन्हा फटका बसू लागला आहे.

आता तुम्हीच बिले मिळवा

ठाणेकरांना वेळेत कराची बिले पाठवण्याची क्षमता आपल्याकडे नाही हे लक्षात आल्याने हतबल महापालिकेने ठाणेकरांनी प्रभाग समिती कार्यालयांमधून ही बिले मिळवावीत, असे आवाहन केले आहे. ३१ मेपर्यंत करभरणा केल्यास मोठी सवलत असली तरी भौगोलिक परिस्थिती आणि बिलांची संख्या पाहता वेळेत बिले पाठविणे शक्य होईल याची महापालिका प्रशासनालाच खात्री नाही. त्यामुळे प्रभाग समिती कार्यालयांमध्ये वास्तव्याचा पुरावा दाखवून बिले मिळवून घ्या आणि वेळेत भरणा करून सवलत पदरात पाडून घ्या, असे आवाहन महापालिकेने केले आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या संकेतस्थळावर वेळेत बिलाचा भरणा केल्यास जाहीर केलेली करसवलत मिळू शकते, असा दावाही प्रशासनाने केला आहे. ३१ मेपर्यंत ऑनलाइन बिल भरणा केल्यास १० टक्के सवलत वजा करून बिलाची रक्कम दर्शवली जाईल, असा दावा प्रशासकीय सूत्रांनी केला.