ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेच्या एका जागेसाठीच्या लढाईत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढाई पाहायला मिळणार आहे. शिवसेनेकडून रविंद्र फाटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे रिंगणात आहेत. त्यामुळे ही लढत रंगतदार होणार आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठीचा अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. यापार्श्वभूमीवर सेनेकडून रविंद्र फाटक यांचे नाव निश्चित करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर युतीचे उमेदवार म्हणून रविंद्र फाटक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. बंडखोरी टाळण्यासाठी अखेरच्या दिवशी शिवसेनेकडून नाव जाहीर करण्यात आले. फाटक हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

Ambadas Danve on asaduddin owaisi
‘खान पाहिजे की बाण?’, बाळासाहेबांची ही भूमिका उबाठा गटाने का बदलली? अंबादास दानवेंनी केलं स्पष्ट
Mohite-Patil, Mohite-Patil family revolt,
मोहिते-पाटील कुटुंबीयांचे २१ वर्षांनंतर पुन्हा बंड !
Suresh taware, NCP,
मविआत निर्णय होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने केला उमेदवार जाहीर, काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांचा आरोप
maval lok sabha
अखेर मावळमधून शिवसेनेकडून खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर