‘सह्य़ाद्री प्रतिष्ठान’च्या लढय़ाला यश

इयत्ता सातवीच्या इतिहास विषयातील छत्रपती संभाजी महाराजांविषयीच्या धडय़ात अखेर त्यांच्या जन्मतारखेचा उल्लेख केला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी झाला. मात्र पाठय़पुस्तकातील धडय़ात त्यांच्या या जन्मतारखेचा उल्लेख नव्हता. ‘सह्य़ाद्री प्रतिष्ठान’ ही संस्था गेली चार वर्षे ही त्रुटी दूर होण्यासाठी शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करत होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येताना पुढील शैक्षणिक वर्षांपासून सातवीच्या पुस्तकाच्या नव्या सुधारित आवृत्तीत संभाजी महाराजांचा जन्म आणि मृत्यू या दोन्ही तारखांचा उल्लेख करण्यात आला आहे.

virendra mandlik criticizes shahu chhatrapati s family
छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका
kolhapur lok sabha seat, sanjay mandlik, sanjay mandlik controversial statement, shahu maharaj, historians criticise sanjay mandlik, shivsena, bjp, congress, lok sabha 2024, election 2024, mahayuti, maha vikas aghadi, kolhapur politics, kolhapur shahu maharaj, controversial statment on shahu maharaj,
छत्रपतींच्या गादीचा मंडलिकांकडून अवमान; इतिहास संशोधकांनी व्यक्त केला निषेध
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
latur lok sabha marathi news, shivraj patil chakurkar latur latest news in marathi
शिवराज पाटील यांच्या ‘देवघरा’ बाहेरील गर्दी वाढली

‘महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम’ संशोधन मंडळाचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी तसे लेखी पत्र ‘सह्य़ाद्री प्रतिष्ठान’ला दिले असून लवकरच नव्या शैक्षणिक वर्षांतील सातवीच्या पाठय़पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मतारखेची माहिती देण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांनी या विषयात संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला होता. छत्रपती संभाजी राजे यांची जन्म तारीख पाठय़पुस्तकात आवश्यक होती, परंतु संबंधित विभागाच्या गलथान कारभारामुळे जन्म तारीख पाठय़पुस्तकात टाकण्यात न आल्याने प्रतिष्ठानने या विषयात आंदोलनाचा पावित्रा घेतला होता, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी दिली.

कोणत्याही थोर व्यक्तिमत्त्वाचा परिचय लेख मग तो कितीही छोटा असो, त्यात त्याच्या जन्म आणि मृत्यूची नोंद आवश्यक असते. छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भातील धडय़ात नेमका त्याच गोष्टीचा अभाव होता. त्यामुळे प्रतिष्ठानने ती त्रुटी दूर करण्यासाठी पाठपुरावा केला. आता चार वर्षांनंतर का होईना धडय़ात तो उल्लेख केला जाणार असून त्यामुळे इतिहासप्रेमी म्हणून समाधान वाटते.

-श्रमिक गोजमगुंडे, ‘सह्य़ाद्री प्रतिष्ठान’