विरारमधील दोन ज्येष्ठ नागरिकांची सहा दिवसांत साडेआठशे किमी भ्रमंती

वय झाले की आणि त्यातही गंभीर आजार असेल तर माणसे हिंमत हारतात आणि हताश होतात. विरारमधील दोन वृद्धांनी मात्र वार्धक्य आणि आजारावर मात करत चेन्नई आणि विशाखापट्टणम असा सायकल प्रवास करून आपल्यातली जिद्द दाखवून दिली आहे. यातीेल एक वृद्ध गंभीर अपघातातून सावरला होता तर एकावर बायपास सर्जरी झालीे होतीे.
विरारमध्ये राहणारे विठ्ठलराव पाटील-थोरवे हे ७४ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक. त्यांना पूर्वी सायकल चालविण्याचा आवड होतीे. ते नियमित सायकल चालवायचे. मागीेल वर्षी ते एका गंभीर अपघतातून बचावले. त्यांच्या छातीेच्या पाच बगरडय़ा तुटल्या आणि हात जायबंदी झाला होता. परंतु त्यातून ते पूर्णपणे बरे झाले. पुन्हा सायकल चालविण्याचीे इच्छा जागृत झालीे. आपले मित्र रवींद्र राऊत यांना त्यांनी गळ घातलीे. राऊत यांचे वय ६५ वर्ष आहे. मागीेल वर्षी त्यांचीे बायपास शस्त्रक्रिया झालीे होतीे. दोघांनी आपल्या मुलांना मोहिमेविषयी सांगितले. सुरुवातीेला कुटुंबीय तयार नव्हते. पण काहींनी सोबत येण्याचीे तयारी केली आणि त्यांचा प्रवास सुरू झाला. या दोन ज्येष्ठ नागरिकांनी चेन्नई ते विशाखापट्टणम असा साडेआठशे किलोमीटरचा प्रवास सहा दिवसांत पूर्ण केला.

सायकल कुठल्याही वयातीेल माणूस चालवू शकतो. त्याला कसलेच बंधन नाही हे आम्हाला दाखवून द्यायचे होते म्हणून आम्ही हा प्रवास केला. आमच्या सोबत आमचीे मुले होतीे त्यामुळे भीेतीे नव्हतीे. दरदिवशीे आम्ही १०० ते १५० किलोमीटर प्रवास करायचो. आम्हा दोघांना कसलाच वैद्यकीय त्रास झाला नाही. या छोटय़ा सायकल मोहिमेने आमचा आत्मविश्वास दुणावला असून आता आम्ही भारताच्या सीमा सायकलीेले पालथ्या घालणार आहोत.
-विठ्ठलराव पाटील-थोरवे