राज्य परिवहन मंडळाच्या बस तिकीट आरक्षणासाठी अ‍ॅप

धो-धो पडणारा पाऊस..लांबचा प्रवास..एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांची होणारी धावपळ .. बस डेपोच्या एका कोपऱ्यातील लहानग्या खिडकीकडे जाऊन महिनाभर आधी आरक्षणासाठी रांग लावत ताटकळणाऱ्या प्रवाशांना राज्य परिवहन महामंडळाने उशिरा का होईना दिलासा दिला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसने दूरगावी जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांना आता आरक्षण करण्यासाठी महामंडळाने अ‍ॅपची निर्मिती केली आहे.

Rupee hits all time low against US Dollar
रुपयाची विक्रमी नीचांकापर्यंत घसरण; रिझर्व्ह बँकेचा डॉलर विक्रीद्वारे हस्तक्षेप अयशस्वी 
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
IIIT Nagpur job hiring news marathi
IIIT Nagpur Recruitment 2024 : नागपूरच्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेमध्ये नोकरीची संधी! ‘या’ पदावर होणार भरती
Do you know the beginnings of Gmail
जीमेलची सुरुवात आणि एप्रिल फूल कनेक्शन तुम्हाला माहित्येय का?

दूरवरच्या प्रवासासाठी ऑनलाइन आरक्षणाची सुविधा सर्वच प्रवासी सेवांकडून उपलब्ध करून दिली जात असताना राज्य परिवहन महामंडळाचा कारभार या आघाडीवर प्रवाशांच्या हिताचा नव्हता. एखाद्या स्थळी जाण्यासाठी प्रवासी सेवेचे आरक्षण करायचे असेल तर महिनाभरापूर्वी समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या बस आगारात लहानग्या तिकीट खिडक्यांवर लांबच्या लांब रांगांमध्ये उभे राहाण्याचा द्राविडी प्राणायाम प्रवाशांना करावा लागत होता. उशिरा का होईना हे लक्षात आल्याने महामंडळाने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी हळूहळू नवे आणि आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यास सुरुवात केली आहे.

अ‍ॅपमध्ये सुरुवातीला स्वत:ची माहिती नोंद करून लॉगीन करणे गरजेचे आहे. प्रवाशांना याव्दारे त्यांच्या सोयीचे आसन क्रमांक, फेरीची वेळ, बससेवेचा प्रकार, प्रवासाकरिता चढण्याचे व उतरण्याचे ठिकाण इत्यादी बाबी निवडता येतील. तिकिटाच्या आगाऊ आरक्षणाकरिता नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्टच्या सहाय्याने पैसे देणे सोपे होणार आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्या सोयीनुसार कोणत्याही ठिकाणावरून राज्य परिवहन फेऱ्यांचे आरक्षण करू शकतात. तरी सर्व प्रवाशांनी आपल्या वेळेची बचत करून तत्पर सेवा मिळविण्यासाठी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाने केले आहे.

  आरक्षणासाठीचे संकेतस्थळ

लांब, मध्यम तसेच लघू पल्ला मार्गावरील एसटी प्रवासाचे आगाऊ आरक्षण या अ‍ॅपच्या माध्यमातून करता येईल, अशी सुविधा महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे. गुगल प्ले स्टोरमधून ‘टरफळउ टु’्री फी२ी१५ं३्रल्ल ंस्र्स्र्’ डाऊलोड करून सोयीस्कररीत्या आपण आपले आरक्षण करू शकतो. हा अ‍ॅप येत्या रविवारपासून कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती महामंडळातील सूत्रांनी दिली.