राज्य शासनाच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे आजही काम बंद

राज्य शासनाच्या सेवेतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या दोन दिवसीय संपाचा फटका पहिल्याच दिवशी, गुरुवारी जाणवला. या कर्मचाऱ्यांच्या संपाचा विविध शासकीय विभागांच्या कामावर फारसा परिणाम झाला नसला तरी, ठाणे जिल्हा मनोरुग्णालय तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये मात्र आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. ठाणे जिल्हा रुग्णालय, कामगार रुग्णालय, मनोरुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वच सफाई कामगार, वॉर्डबॉय, शिपायांनी या संपात सहभाग घेतला असल्याने रुग्णांचे हाल होताना दिसत आहेत.  हा संप शुक्रवारीदेखील कायम राहणार असल्याने रुग्णांच्या हालात भर पडण्याची शक्यता आहे.

मनोरुग्णालयात चतुर्थश्रेणीतील एकूण ३५० कर्मचारी काम करत असून सर्व जण संपात सहभागी झाले आहेत. संपावर जाण्यापूर्वी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला कळवले असल्याने शासकीय विभागांनी दोन दिवसांसाठी कंत्राटी कामगारांची नेमणूक केली आहे. मात्र मनोरुग्णालयातील अतिरिक्त रुग्णांची संख्या पाहता रुग्णालयातील रुग्णांना सांभाळणे कठीण होत असल्याचे दिसत आहे. मनोरुग्णालयात ३० रुग्णकक्ष असून १५१६ रुग्णांची संख्या आहे. मात्र या रुग्णांना सांभाळण्यासाठी केवळ ९० कंत्राटी कामगार आणि १०० परिचारिका कार्यरत असून हा डोलारा सांभाळणे मर्यादित कर्मचाऱ्यांना अवघड होऊ लागले आहे. मनोरुग्णालयात रुग्णांना जेवण भरविणे, औषध देणे, रुग्णांची शारीरिक स्वच्छता यासारख्या दैनंदिन सुविधा पुरविणे मर्यादित कर्मचाऱ्यांमुळे कठीण जात आहे. मनोरुग्ण रुग्णालयात फिरत असताना त्यांना आटोक्यात आणण्यासाठी  कर्मचाऱ्यांची गरज असते, परंतु कर्मचारी नसल्याने त्यांना एका खोलीतच डांबून ठेवले आहे. त्यामुळे गुरुवारी कक्षाबाहेर पडण्यासाठी अनेक रुग्णांचा कल्याणमधील संतोषी माता रस्ता नव्याने तयार करण्यात आला आहे. उर्वरित भागाचे सीमेंट काँक्रीटचे काम शिल्लक आहे. त्यामुळे चालकांना या रस्त्यावरून वाहन चालविताना कसरत करावी लागते. लालचौकी, आधारवाडी, उंबर्डे, सापर्डे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. कल्याण पूर्वेतील तिसगाव, चक्कीनाका, नेवाळी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. येथील सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम रखडले आहे. काटेमानिवली, कोळसेवाडी भागातील काही रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. डोंबिवलीत कोपर उड्डाण पूल, टिळक रस्ता, अस्तित्व शाळेसमोरील रस्ता, एमआयडीसी कार्यालयासमोरील रस्ता, कल्याण रस्ता, शिवाजीनगर ते सागाव, एमआयडीसीतील अंतर्गत रस्ते, शिळफाटा सेवा रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.  एमआयडीसीतील काही रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून यामुळे या भागात नियमित प्रवास करणाऱ्या रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. २७ गावांमधील पोहच रस्त्यांचीही चाळण झाली आहे.  शहरातील सर्व रस्त्यांवर अशी परिस्थिती असल्याने वाहतूक कोंडीचे प्रमाणही वाढले आहे.

मलमपट्टी उखडली

गणपतीपूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासंबंधी सातत्याने दबाव वाढत असल्याने महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने काही ठिकाणी वरवरची मलमपट्टी केली होती. मात्र, या खड्डय़ांत टाकण्यात आलेली खडी, माती दोन दिवसांत वाहून रस्त्यांवर पसरली आहे. त्यामुळे या रस्त्यांवरून ये-जा करताना दुचाकीस्वारांना अतिशय काळजीपूर्वक दुचाकी हाकावी लागत आहे.

कर्मचाऱ्यांच्या मागण्या..

सातवा वेतन आयोग तात्काळ मंजूर करावा, कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वाखाली कायमस्वरूपी नोकरी द्यावी,  वैद्यकीयदृष्टय़ा अपात्र असलेल्या पाल्यास शासकीय सेवेत रूजू करून घ्यावे, चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्ग सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या एका पाल्यास शासकीय सेवेत घ्यावे, रिक्त पदांची तात्काळ भरती करावी, सर्व खात्यातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना शासकीय वसाहतीत घरे मिळावीत, अशा मागण्या या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.

महापालिका हद्दीतील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे तातडीने हाती घेण्यात येऊन रस्ते सुस्थितीत केले जातील. निकृष्ट व कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदार, अभियंत्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

पी. वेलरासू, आयुक्त

कल्याण-डोंबिवली परिसरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने भरण्याची प्रक्रिया सुरू करावी. ठेकेदार आणि पालिका अभियंते संगनमताने रस्त्यांची ढिसाळ कामे करतात आणि ही कामे पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणली जात नाहीत. अशा बेडर ठेकेदार, अभियंत्यांवर कठोर कारवाई करावी.

डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार