देशातील लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजना  देशातील सर्व बँकेत सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून ठाण्यातील राम मारुती मार्ग येथील आंध्र बँकेतून कर्ज घेतलेल्या कर्जधारकांना खासदार राजन विचारे यांच्या हस्ते कर्जाचे वाटप करण्यात आले. यावेळी बँकेच्या सहाय्यक सरव्यवस्थापक तिरुमला राव, बँकेच्या व्यवस्थापक राधा राणे आदी मान्यवर उपस्थित होते. ठाणे जिल्ह्य़ात प्रथम या योजनेचा शुभारंभ झाला. आंध्र बँकेच्या ठाण्यातील नौपाडा, मानपाडा ,हिरानंदानी घोडबंदर, कासरवडवली अश्या ४ शाखा असून येथील आता पर्यंत २५० ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला.

या योजने अंतर्गत  लघु उद्योजकांना १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज उपलब्ध होणार आहे. यासाठी सरकारने एकूण २० हजार कोटींची तरतूद केली आहे. विना अनुदानित लघुउद्योगांना निधी उपलब्ध करून देण्याचे मुद्रा योजनेचे लक्ष्य आहे.