गुलाल आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जोरदार जल्लोष करून विविध राजकीय पक्षांच्या पाठीराख्यांनी विजयी उमेदवारांचे जोरदार अभीष्टचिंतन करून निवडणुकीतील विजयाचा आनंद व्यक्त केला. निवडणूक निकालाची उत्कंठा असलेले कार्यकर्त्यांचे जथे मतमोजणी केंद्राबाहेर सकाळीच जमा होऊ लागले होते. साधारण साडेदहा-अकरापासून प्रभायनिहाय आघाडीवर असलेल्या उमेदवारांची माहिती समाजमाध्यमांद्वारे प्रसारित होऊ लागली. त्यानंतर तासाभरातच एकेक निकाल येऊ लागला. त्यामुळे मतमोजणी केंद्राबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले.

त्या उत्साहाच्या भरात मिरवणुकीचा बंदी हुकूमही ठिकठिकाणी मोडीत निघाला. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रावर गर्दी केली होती. सुरक्षेच्या दृष्टीने मतमोजणी केंद्राच्या काही अंतरापासूनच पोलिसांचा कडक बंदोबस्त असल्याने मतमोजणी केंद्राच्या परिसरात कार्यकर्ते निकालाच्या प्रतीक्षेत पाहायला मिळत होते. भाजप आणि शिवसेना पक्षाच्या मुख्य कार्यालयाबाहेर सकाळच्या सुमारास फारसा उत्साह जाणवला नसला तरी दुपारी निकालाची रंगत वाढत गेल्यावर पक्ष कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर विजयाचा आनंद साजरा केला. ‘निवडून निवडून येणार कोण, शिवसेनेशिवाय आहेच कोण?’ अशा घोषणा देत एकीकडे शिवसेनेचे कार्यकर्ते विजय साजरा करत होते.  एकीकडे शिवसेनेची घराणेशाही मोडीत काढत विजयावर शिक्कामोर्तब केल्याने भाजपचे विजयी उमेदवार धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा घोषणा देत प्रतिस्पर्धी उमेदवारांना टोला देताना दिसत होते.

ratnagiri sindhudurg lok sabha marathi news
रत्नागिरीत महायुतीपुढे कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे आव्हान
rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
The plight of workers in coalition politics in Raigarh
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरपट
raigad lok sabha marathi news, sunil tatkare marathi new
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरफट

पातलीपाडा, पोखरण रस्ता क्रमांक २, वर्तकनगर, वागळे इस्टेट, महागिरी, कळवा मुंब्र्य़ातील काही भागांत सकाळपासून मतमोजणी सुरू झाली. मतमोजणी केंद्रावर ध्वनिक्षेपकावर विजयी उमेदवारांची नावे जाहीर होताच मतमोजणी केंद्रावर उमेदवार, कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळत होता. मतमोजणीच्या वेळी वारंवार होणारा मतमोजणी यंत्रातील बिघाडामुळे कार्यकर्त्यांची उत्कंठा वाढताना दिसत होती. ठाणे शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या नौपाडा प्रभागात भाजप विजयी ठरल्याचा निकाल सायंकाळी उशिरापर्यंत जाहीर झाल्यावर सुशिक्षितांच्या परिसरात कमळ फुलल्याचा आनंद भाजप कार्यकर्ते व्यक्त करताना दिसले. सिद्धेश्वर तलाव परिसरात विजय होण्याची अपेक्षा लावून बसलेल्या शिवसेनेच्या विचारे कुटुंबीयांच्या पारडय़ात विजयाची एकच जागा मिळाल्याने मतमोजणी केंद्रातून निघण्यास क्षणाचाही विलंब केला नाही. तसेच निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले अनुक्रमे नारायण पवार आणि अशोक राऊळ यांनी विजय मिळविला. त्यामुळे त्यांच्या पाठीराख्यांनी होलिक्रॉस शाळेबाहेर जल्लोष केला.

भाईंच्या बंगल्यासमोर ताईची आतषबाजी

वर्तकनगर प्रभाग समितीत उभ्या असलेल्या सुधाकर चव्हाणांकडे परमारप्रकरणी परिसरातील नागरिकांचे विशेष लक्ष होते. याच प्रभागात शिवसेनेतून परिशा सरनाईक उभ्या असल्याने या दोन उमेदवारांच्या निकालाच्या प्रतीक्षेत शिवाईनगर, देवदया परिसरांत कार्यकर्त्यांची एकच गर्दी होती. दुपारी शिवसेनेच्या परिषा सरनाईक विजयी झाल्याचे ध्वनिक्षेपकावर कळताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला. महिला कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत देवदया चौकात फुगडय़ा घालून आनंदोत्सव केला. विशेष म्हणजे विजय साजरा करण्यासाठी परिषा सरनाईकच्या कार्यकर्त्यांनी सुधाकर चव्हाणांच्या बंगल्याबाहेरच ठाण मांडल्याने या परिसरातील जल्लोषाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले होते. एरव्ही सुधाकर चव्हाणांच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांची झुंबड असली तरी शिवसेनेची आतषबाजी होत असताना मात्र बंगल्याबाहेर शुकशुकाट होता.