खरेदीसोबतच बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी देणाऱ्या ‘लोकसत्ता ठाणे शॉिपग फेस्टिव्हल’च्या भाग्यवान विजेत्यांचा गौरवसोहळा शनिवारी नवी मुंबईत थाटात पार पडला. वाशी येथील तळवलकर जिममध्ये शनिवारी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमात अभिनेता सुयश टिळक याच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीत सुरू असलेल्या ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलचा पहिला आठवडा उत्साहात पार पडला. खरेदीसोबत आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी असल्यामुळे फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणाऱ्या १७० दुकांनात ग्राहकांची झुंबड उडत आहे. भाग्यवान विजेत्यांना वाशी येथील तळवलकर जिममध्ये झी मराठी वाहिनीवरील ‘का रे दुरावा’ या मालिकेत ‘जय’ची भूमिका साकारणारा अभिनेता सुयश टिळक याच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. या वेळी तळवलकर जिमचे व्यवस्थापक विश्वास शिंदे उपस्थित होते. सुयशने वाशीच्या इन ऑर्बिट मॉलमधील दि रेमण्ड शॉप व खारघरच्या हॉलीवूड ऑप्टिशियन प्रा. लि. या शोरूम्सनाही भेट दिली. ‘लोकसत्ता’ने सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर बक्षिसांचा वर्षांव होतो आहे, अशा शब्दांत सुयशने ‘ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’चे कौतुक केले.

विजेत्यांच्या प्रतिक्रया
‘लोकसत्ता शॉपिंग फेस्टिव्हल’च्या निमित्ताने वामन हरी पेठे ज्वेलर्सकडून मिळालेल्या सोन्याच्या शिक्क्याचे बक्षीस माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. असे फेस्टिव्हल वारंवार व्हावेत.
– योगिनी गुरव

‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित हा फेस्टिव्हल आनंददायी आहे. मला सोन्याचे नाणे मिळवता आले, ते या फेस्टिव्हलमुळेच. त्याबद्दल ‘लोकसत्ता’चे आभार.
– ऊर्मिला दीक्षित

टीव्हीवर नेहमी दिसणाऱ्या अभिनेत्याच्या हस्ते पारितोषिक मिळाल्याचा आनंद अधिक आहे. हा उपक्रम खरोखरच वाखाणण्याजोगा आहे.
– संगीता चौधरी,
कार्बन मोबाइल विजेता

ग्राहकांशी जवळीक साधण्यासाठीच अत्यंत नावीन्यपूर्ण असा ‘लोकसत्ता शॉपिंग फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात आला असून त्याला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळत आहे. यातील आकर्षक बक्षिसांमुळे विजेत्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद हीच आमच्यासाठी समाधानाची पोचपावती आहे.
– विश्वास शिंदे,
तळवलकर्स जिमचे व्यवस्थापक

‘लोकसत्ता’चा उपक्रम अतिशय उत्तम असा असून पुढेदेखील हा फेस्टिव्हलचा उपक्रम सुरू ठेवावा असे आम्हाला वाटते.
अमित कुमार शर्मा, इनऑर्बिट मॉलमधील दि रेमण्ड शॉपचे मॅनेजर

‘लोकसत्ता शॉपिंग फेस्टिव्हल’ची सुवर्णसंधी नागरिकांच्या पसंतीस पडली आहे. हा उपक्रम प्रत्येकाशी नाते जोडणारा आहे. ‘लोकसत्ता’ वृत्तपत्र असा उपक्रम राबवणारे एकमेव वृत्तपत्र आहे.
विजय कदम, हॉलीवूड ऑप्टिशियन्स प्रा.लि, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर.