‘लोकसत्ता ठाणे’ शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये पारितोषिकांची लयलूट
‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ आता अखेरच्या टप्प्यात आला असून या महोत्सवाला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या खरेदी उत्सवात ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली आणि कल्याण परिसरातील शंभरहून अधिक गृहोपयोगी वस्तूंचे शो रूम्स सहभागी झाले आहेत. महोत्सवात २५० रुपयांपेक्षा जास्त रकमेची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना भाग्यवान सोडतीद्वारे आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळत आहे. २३ दिवसांच्या या महोत्सवाची १४ फेब्रुवारी रोजी सांगता होणार असून अखेरच्या ४ दिवसांमध्ये महोत्सवातील सहभागी दुकानांमध्ये खरेदी करून बक्षिसांची लयलूट करण्याची संधी ग्राहकांना घेता येणार आहे.
‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये’ सहभागी होणाऱ्या ग्राहकांना दररोज सुवर्णमुद्रा, अंकुर ज्वेलर्सकडून चांदीचे नाणे, स्कायलार्क इलेक्ट्रॉनिक्स, रेमंड, शगुन, कलानिधी आणि ओंकार किचन्स यांच्याकडून आकर्षक पारितोषिके मिळत आहेत. दर आठवडय़ाच्या पारितोषिकांमध्ये एलईडी टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉटर प्युरीफायर, मायक्रोवेव्ह ओव्हन, पैठणी साडी ही पारितोषिके देण्यात येत आहेत. महोत्सवाच्या अखेरीस सोडतीद्वारे एका भाग्यवान ग्राहकाला कार व दुसऱ्या भाग्यवंत ग्राहकाला केसरी टुर्सकडून दोन व्यक्तींसाठी सहल यांच्यासारखी बक्षिसे बम्पर पारितोषिक म्हणून दिली जाणार आहेत. १४ फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. वीकएण्ड आणि ोकंड होम्समधील नामांकित ‘सॉफ्ट कॉर्नर’ हे या फेस्टिव्हलचे मुख्य प्रायोजक असून युनियन बॅंक आणि प्रशांत कॉर्नर असोसिएट पार्टनर आहेत. त्याचप्रमाणे प्लॅटिनम पार्टनर झेना डिझाईन, ट्रॅव्हल पार्टनर केसरी टूर, वॉर्डरोब पार्टनर दी रेमण्ड शॉप, गिफ्ट पार्टनर कलानिधी, स्कायलार्क इलेक्ट्रॉनिक्स व ओंकार किचन वल्र्ड हे आहेत.

कसे सहभागी व्हाल?
ठाणे शॉपिंग महोत्सवात सहभागी दुकानात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या बक्षिसांचा लाभ मिळू शकेल. या दुकानांमध्ये २५० रुपयांपेक्षा जास्त खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बिल दिल्यानंतर दुकानदारांकडून त्यांना एक कूपन दिले जाईल. ते भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे. अर्धवट माहिती भरलेल्या कूपन्स ग्राह्य़ धरल्या जाणार नाहीत. दररोज ड्रॉप बॉक्समधून कूपन्स संकलित करून ठाणे लोकसत्ता कार्यालयात आणण्यात येणार आहेत. त्यातून दररोज लकी ड्रॉ पद्धतीने भाग्यवान विजेत्याची निवड केली जाईल. प्रत्येक भाग्यवान विजेत्याची नावे ‘लोकसत्ता ठाणे’मधून प्रसिद्ध केली जातील. ‘लोकसत्ता’च्या खरेदी योजनेत उपरोक्त तिन्ही शहरातील दुकानदारांना ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. महोत्सवातील सर्व योजनांना अटी-शर्ती लागू आहेत.