नाटय़दिग्दर्शक अजित भुरे यांचा वक्त्यांना सल्ला
वक्तृत्वाचा विषय मांडताना वक्त्याने त्यातून उपाय सुचवणे अपेक्षित नाही. तरीही एखाद्या विषयाच्या अंगाने वेगवेगळे पर्याय मात्र सुचवणे आवश्यक ठरते. वक्तृत्वातील विषय पूर्णत्वाच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचे आहे. आजचा तरुण वेगळा विचार करतो. ज्येष्ठांच्या विचार प्रक्रियेत तोच तोचपणा येत असतो किंवा ते यंत्रणेत अडकून पडलेले असतात. त्यामुळे तरुण पिढी जो विचार करते तो पर्यायी मार्ग त्यांच्या वक्तव्यातून मांडणीत उतरण्याची गरज असल्याचे मत निर्माते, दिग्दर्शक अजित भुरे यांनी येथे व्यक्त केले. ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्ोषु’ स्पर्धेच्या ठाण्याच्या विभागीय अंतिम फेरीमध्ये त्यांनी हे विचार मांडले.
या स्पर्धेसाठी मान्यवर परीक्षक म्हणून झुनझुनवाला महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या माजी प्रमुख प्रा. नीला कोर्डे, सिद्धार्थ महाविद्यालयाच्या माजी मराठी विभाग प्रमुख प्रा. मीना गुर्जर आणि निर्माते, दिग्दर्शक अजित भुरे उपस्थित होते. यावेळी ‘तन्वी हर्बल प्रॉडक्ट्स’च्या मानसी धामणकर आणि ऋचा पै उपस्थित होत्या.
ठाण्यातील प्राथमिक फेरीतून निवडण्यात आलेल्या आठ स्पर्धकांनी या विषयावरील मत मतांतरे आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून उपस्थितांसमोर मांडले. यावेळी परीक्षक प्रा. नीला कोर्डे यांनी मार्गदर्शन करताना तरुणांचे कौतुक करत त्यांच्या तयारीला दाद दिली.
‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्ोषु’ या माध्यमातून ‘लोकसत्ता’ने तरुण पिढीला बोलते केले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष असून ‘जनता सहकारी बँक लि.’ आणि ‘तन्वी हर्बल पॉडक्ट्स’ हे स्पर्धेचे सहप्रायोजक आहेत. ‘सिंहगड इन्स्टिटय़ूट’, ‘मांडके हिअरिंग सव्‍‌र्हिसेस’, ‘इंडियन ऑइल’, ‘इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट’ यांचे या स्पर्धेस सहकार्य आहे. तर ‘युनिक अकॅडमी’ व ‘स्टडी सर्कल’ हे या स्पर्धेचे नॉलेज पार्टनर आहेत.

ठाणे विभागाचा निकाल..
प्रथम पारितोषिक -रिद्धी म्हात्रे, पिल्लाई महाविद्यालय, पनवेल<br />द्वितीय पारितोषिक – स्वानंद गांगल, विद्या प्रसारक मंडळ, विधी महाविद्यालय, ठाणे<br />तृतीय पारितोषिक – अविनाश कुमावत, सी.एच.एम महाविद्यालय, उल्हासनगर
उत्तेजनार्थ पारितोषिक – प्रज्ञा पोवळे,जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणे