एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या वरिष्ठ नागरिकांना फसवून त्यांच्या खात्यातील पैसे लांबवणाऱ्या ठगाला पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅपची मदत घेऊन बेडय़ा ठोकल्या. राजीव भट असे या तरुणाचे नाव असून बारबालांवर पैसे उधळण्यासाठी अशा प्रकारची कृत्ये तो करत असल्याचे उघड झाले आहे.

लष्करातून निवृत्त झालेले भिकाजी कदम हे २४ एप्रिलला मीरा रोड येथील एटीएम केंद्रात गेले होते. त्या वेळी राजीव भट हा कदम यांच्या पाठीमागेच उभा होता. या वेळी त्याने कदम यांचा पिन क्रमांक पाहून घेतला. कदम एटीएम कार्ड योग्य पद्धतीने हाताळत नसल्याचे भट याने त्यांना सांगितले आणि कदम यांचे कार्ड आपल्याकडे घेऊन ते शिताफीने बदलले. त्यानंतर काही वेळातच कदम यांच्या खात्यातील ४० हजार रुपये काढण्यात आल्याचे त्यांना समजले. कदम यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याच पद्धतीने भट याने आणखी एका व्यक्तीची १९ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली.

Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
gangster mukhtar ansari family
स्वातंत्र्यसैनिक ते कुख्यात गुंड; एका कुटुंबाचा सुरस व चमत्कारिक प्रवास
A police officer was killed in firing by a goon near the Government Medical College Hospital in Kathua Jammu and Kashmir
गुंडाच्या गोळीबारात पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू; अन्य जखमी, जम्मू-काश्मीरमधील घटना
Loksatta anvyarth A terrorist attack on Pakistan naval air base in Balochistan province
अन्वयार्थ: अनागोंदीचा आणखी एक पाकिस्तानी पैलू

या दोन्ही गुन्ह्य़ाचा तपास पोलिसांनी एकत्र सुरू केला. साहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कुचेकर आणि त्यांचे साहाय्यक विजय ब्राह्मणे यांनी एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, परंतु त्यात भट याचा चेहरा स्पष्टपणे दिसून आला नाही. त्यामुळे भट याच्या शोधासाठी मर्यादा आल्या, मग पोलिसांनी शक्कल लढवत फसवणूक झालेल्या दोन्ही एटीएम केंद्रांच्या परिसरातल्या मोबाइल टॉवरच्या आधारे त्या वेळी त्या परिसरात कार्यरत असलेल्या मोबाइलची यादी मागवली. या दोन्ही केंद्रांजवळ कार्यरत असलेले समान मोबाइल क्रमांक पोलिसांना शोधायचे होते. हे काम म्हणजे गवतातून सुई शोधण्यासारखे होते, परंतु पोलिसांनी चिकाटी सोडली नाही. शेवटी अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर दोन्ही केंद्रांजवळ कार्यरत असलेले दहा ते बारा समान मोबाइल क्रमांक पोलिसांनी शोधून काढले आणि हे क्रमांक आपल्या मोबाइलवर सेव्ह केले. मोबाइल क्रमांक सेव्ह झाल्यानंतर ते आपोआपच व्हॉट्सअ‍ॅपच्या यादीत दिसू लागले. व्हॉट्सअ‍ॅपच्या डीपीमध्ये असलेल्या छायाचित्रांची पडताळणी केली असता एक छायाचित्र सीसीटीव्ही फुटेजमधल्या व्यक्तीशी जुळत होते. तो मोबाइल क्रमांक मग कुठे कार्यरत आहे याचा शोध घेतल्यानंतर मुंबईतील समुद्रा नावाच्या बारमध्ये आरोपी असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी त्वरित हालचाल करून भट याला बारमधून अटक केली.

भट हा मूळचा गुजरातमधला. तो आधी शेअर बाजारात काम करत होता. बारबालांवर पैसे उधळण्याची सवयही त्याला होती, परंतु शेअर बाजारातील काम सुटल्याने झटपट पैसे मिळवण्यासाठी भटने एटीएम केंद्रावर लक्ष्य केंद्रित केले. अशा प्रकारे फसवणूक झालेल्यांनी मीरा रोड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.