पडघा (भिवंडी) येथे राहत असलेली एक तरुणी कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागातून दोन दिवसांपूर्वी जात होती. ती राहत असलेल्या भागातील मकसद खान या तरुणाने तिचा पाठलाग करून हात पकडला. या वेळी त्याने तिच्याशी जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न केला. तरुणीने प्रतिसाद न दिल्याने तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी मकसदने दिली. याविरोधात तरुणीने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.