व्हॉटसअ‍ॅपमुळे वेगवान झालेल्या संदेशवहनाचा आता अनेक जण वेगवेगळ्या कामांसाठी यशस्वीरीत्या वापर करत आहेत. बदलापूर पोलिसांनी नशेखोरी रोखण्यासाठी या संदेश वाहनाचा वापर सुरू केला आहे. जर अमली पदार्थाचा व्यापार व अन्य अनुचित प्रकार घडत असल्यास त्याची माहिती समाज माध्यमांच्या माध्यमातून नागिरकांनी द्यावी असे आवाहन करण्यात येणार आहे. बदलापूर नागरिकांनी पोलिसांच्या या अभियानाचे स्वागत केले आहे.
बदलापूर शहराच्या पूर्व व पश्चिम भागात फलक उभारून या अभियानाची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार कुळगाव बदलापूर शहरातील दारू, जुगार व अंमली पदार्थांबाबत माहिती असल्यास ७७४४८४४८७९ या व्हॉटस अप क्रमांकावर माहिती वा फोटो पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन बदलापूर पूर्व व पश्चिम पोलिसांकडून करण्यात आले आहे. या व्हॉटस अप क्रमांकामुळे पोलिसांना शहरातील दारू, जुगार तसेच अंमली पदार्थांबाबत माहिती मिळाल्यास संबंधितांवर त्वरित कारवाई करणे शक्य होणार आहे. त्यामुळे निश्चितच शहरातील गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होणार आहे. तसेच पोलिसांकडूनही नशेखोरी विरोधातील संदेश व माहितीचा प्रसार करण्यात येणार आहे. या अभियानाला नागरिकांनी भरघोस प्रतिसाद द्यावा व बदलापूर शहर व्यसन मुक्त करण्यास सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
बदलापूर पूर्व व पश्चिम पोलिस ठाण्याच्या वतीने बदलापुरात दारू, जुगार तसेच अंमली पदार्थ विरोधी हे अभियान पोलिस उपायुक्त वसंत जाधव व सहाय्यक पोलिस आयुक्त माणिक बाखरे यांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील व बदलापूर पष्टिद्धr(१५५)म पोलिस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक वांढेकर व त्यांचे सहकारी हे अभियान राबवणार आहेत.