गणेशविसर्जन मिरवणुकांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ठाणे वाहतूक शाखेने अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरातील प्रमुख विसर्जन घाटांकडे जाणारे प्रमुख तसेच अंतर्गत मार्गामध्ये मोठे बदल केले असून या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली आहे. येत्या २३ आणि २७ सप्टेंबर या दोन दिवशी गणेशमूर्ती विसर्जन होईपर्यंत हा वाहतूक बदल लागू असणार आहे. याशिवाय गणेश विसर्जनाकरिता आलेली वाहने मूर्ती उतरविल्यानंतर लगेचच महामार्गाजवळील सेवा रस्त्यांवर पार्किंगसाठी पाठविण्यात येणार आहेत.
’विष्णूनगर, सोपान चौक, राममारुती रोड, मासुंदा तलावमार्गे ठाणे स्थानकाकडे जाणारे सर्व उपरस्ते वाहतुकीसाठी बंद. या मार्गावरील वाहने राम मारुती रोड, स्विट कॉर्नर, गावदेवी बसस्टॉप, शिवाजीपथ, आंबेडकर चौक मार्गे वळविणार.
’ठाणे स्थानक येथून गावदेवी, शिवाजी पथ मार्गे मीनाताई ठाकरे चौक व कळवा बाजूकडे जाणाऱ्या वाहनांना गावदेवीजवळ प्रवेश बंद. या मार्गावरील वाहने ठाणे स्थानक येथून गोखले रोडने कल्पना केंद्र- महात्मा फुले मार्ग घंटाळी चौक, तीन पेट्रोल पंप, एलबीएस मार्गाने सरळ मीनाताई ठाकरे चौक किंवा ठाणे स्थानक येथून आंबेडकर चौक, अशोक सिनेमा, एस.टी. आऊट गेट, चेंदणी कोळीवाडा, सिडको रोड मार्गे कळवा या पर्यायी मार्गे जातील.
’चरई तसेच वीर सावरकर रोडने गडकरी सर्कलकडे येणाऱ्या वाहनांना हॉटेल कोल्हापूर येथे प्रवेश बंद. ही वाहने भवानी चौकातून कोर्टनाका मार्गे वळविण्यात येणार आहेत.
’आनंदनगर चेक नाका तसेच पूर्व द्रुतगती महामार्ग, सव्‍‌र्हिस रोड तसेच नौपाडा येथील महात्मा गांधी मार्गे कोपरी स्थानकाकडे येणाऱ्या खासगी बसगाडय़ांना कोपरी पूल येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. मात्र, परिवहन सेवा आदी उपक्रमाच्या बसेस आणि चारचाकी, दुचाकी, रिक्षा तसेच इतर खासगी हलक्या वाहनांना कोपरी पूल येथून प्रवेश देण्यात येणार आहे.

Combined immersion of Ganesh by various thane mandal
thane Ganesh mandal , Ganesh immersion
संयुक्त मिरवणुकीने गणरायाला निरोप
कोकणची प्रथा ठाण्यात; विविध मंडळांच्या गणेशमूर्तीचे एकत्रित विसर्जन
जयेश सामंत/ नीलेश पानमंद, ठाणे<br />डीजे, ढोलताशांचा दणदणाट, फटाक्यांची आतषबाजी करून गणेशविसर्जनाच्या मिरवणुकीत बडेजाव मिरवण्यात मोठमोठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे धन्यता मानत असताना ठाण्यातील काही मंडळांनी मात्र विसर्जनाची मिरवणूक संयुक्तपणे काढण्याचा निर्णय घेतला आहे. कोकणातील गावांत अशा प्रकारे एकत्रित विसर्जन मिरवणुकीद्वारे गणरायांना निरोप दिला जातो. तोच आदर्श डोळ्यांसमोर ठेवत संयुक्त मिरवणुकीच्या माध्यमातून ध्वनिप्रदूषण तसेच वायुप्रदूषणासोबत पैशांच्या उधळपट्टीवरही नियंत्रण आणण्याचा हा स्तुत्य निर्णय मोठमोठय़ा मंडळांसाठी धडा ठरणार आहे.
विसर्जनाच्या दिवशी विविध मंडळांच्या मिरवणूक गर्दीमुळे वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजतात. गर्दीचे नियोजन व शिस्त नसल्याने तासन्तास मिरवणूक पुढेही सरकत नाही. शिवाय प्रत्येक मंडळाच्या स्वतंत्र ढोलताशाच्या तसेच डीजेच्या आवाजाने होणाऱ्या कल्ल्यामुळे ध्वनिप्रदूषणातही भर पडते. ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांचा आकडा ३६० तर घरगुती गणेशमूर्तीचा आकडा ४१ हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी अवघ्या शहराची कोंडी झाल्याचे चित्र असते. मात्र, यातून मार्ग काढत ठाण्यातील काही सुज्ञ मंडळांनी एकत्रितपणे विसर्जनाची मिरवणूक काढण्यास सुरुवात केली आहे. यामुळे वाहतुकीचे व्यवस्थापन करणे शक्य झाले आहे. शिवाय ध्वनी आणि वायुप्रदूषण आटोक्यात आणण्यासही मदत होत आहे.
नौपाडा येथील विश्वास सामाजिक संस्था व मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या चार वर्षांपासून अशा स्वरूपाचा उपक्रम राबविण्यात येत असून त्यापाठोपाठ आता अन्यत्रही ही प्रथा रूढीस लागली आहे. रामचंद्रनगर भागातील काही मंडळांनीही एकत्रित विसर्जन मिरवणुकीची प्रथा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. एकच ढोल पथक, मिरवणुकीचे वाहन आणि फटाक्यांची आतषबाजी टाळून कमी खर्चात विसर्जनस्थळी निघायचे असे या मंडळांनी ठरविले आहे.

गेल्या चार वर्षांपासून गणपतीची एकत्रित विसर्जन मिरवणूक काढण्यात येत असून त्यामध्ये परिसरातील सुमारे ५० घरगुती गणेशमूर्ती सहभागी होतात. ही मिरवणूक ठाण्यातील वीरगर्जना आणि पुण्यातील शिवगर्जना या दोन ढोलपथकांच्या गजरात निघते. एकाचवेळी ही मिरवणूक निघत असल्याने वाहतुकीचे नियोजन करणे सोयीचे ठरते आणि ध्वनिप्रदूषण कमी होण्यास मदत होते.
– संजय वाघुले, विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष