मुंबईतील गर्दी आसपासच्या शहरांत सरकण्याचा अंदाज

demat accounts touch 15 crore in march 2024
डिमॅट खाती पहिल्यांदाच १५ कोटींच्या पुढे
According to the United Nations Population Fund UNFPA report the estimated population of India is 144 crores
भारताची लोकसंख्या १४४ कोटी, माता मृत्युदरात घट
Sonam Wangchuk
लेख: लडाखवासींची लोककेंद्री विकासासाठी हाक
Botswana threatening Germany to send elephants
२० हजार हत्तींचं जर्मन कनेक्शन काय? जाणून घ्या

वसई-विरार पट्टय़ात येऊ घातलेल्या विकास आराखडय़ाला स्थानिकांकडून मोठय़ा प्रमाणात विरोध होत असतानाच, या पट्टय़ातील नागरीकरणाचा झपाटा दाखवणारी आकडेवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) आराखडय़ातूनच समोर आली आहे. येत्या काही वर्षांत मुंबई शहरातील लोकसंख्या कमी होत जाईल व वसई-विरार, ठाणे, नवी मुंबई अशा जवळच्या शहरांतील लोकसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढेल, असे अनुमान ‘एमएमआरडीए’ने लावले आहे. यामध्ये सध्या १२ लाखांच्या आसपास असलेली वसई, विरार शहराची लोकसंख्या येत्या २४ वर्षांत, २०४१मध्ये ४५ लाखांच्या घरात जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

वसई, विरार शहरांच्या विकास आराखडय़ामध्ये येथील नागरीकरणाचा वेग वाढवणाऱ्या अनेक योजनांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये जास्तीत जास्त घरे निर्माण होण्यासाठी वाढीव एफएसआय देण्याचाही प्रस्ताव आहे. प्रत्येक महसुली गावात गावठाण असते. या गावठाणात ०.३३ एफएसआय असतो. गावठाण आणि गावठाणच्या २०० मीटर परिसरात १ एफएसआय देण्यात आला आहे. त्यामुळे तेथे मोठय़ा इमारती उभ्या राहतील. १५ चौरस मीटर क्षेत्रफळापर्यंत औद्योगिक वसाहती गावठाणात उभ्या राहतील. हरित पट्टय़ातही १ एफएसआय वाढविण्यात आला आहे. स्टेशन डेव्हलपमेंट एरिया (एसएडीए) या योजनेअंतर्गत खासगी विकासकांना गगनचुंबी उभारता येणार आहेत. मेट्रो आणि सागरी महामार्गाच्या दोन्ही बाजूला ५०० मीटपर्यंत बांधकामास परवानगी देण्यात येणार असून त्यासाठी ४ एफएसआयदेखील देण्यात येणार आहे. या सगळ्यांमुळे भविष्यात वसई, विरार पट्टय़ात मोठय़ा प्रमाणात घरांची निर्मिती होईल व पर्यायाने येथील लोकसंख्येत वाढ होईल, असा सूर या आराखडय़ातून व्यक्त करण्यात आला आहे.

हे भाकीत वर्तवताना, येत्या २४ वर्षांत मुंबईची लोकसंख्या कमी होईल, असा आशावादही व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईची लोकसंख्या २०११ च्या जनगणेचा आधार घेऊन १ कोटी २४ लाख ४२ हजार ३७३ असल्याचे दाखवण्यात आले आहे. २०२१ मध्ये ही लोकसंख्या १ कोटी २७ लाख ८६ हजार ६९२ एवढी दाखवण्यात आली आहे. म्हणजे दहा वर्षांत जवळपास केवळ ४ लाखांची वाढ गृहीत धरण्यात आली आहे. तर २०३१ मध्ये १ कोटी १९ लाख ९ हजार आणि २०४१ मध्ये १ कोटी ६ लाख ३७ हजार ५२६ एवढी दाखविण्यात आली आहे. म्हणजे सन २०४१ मध्ये मुंबईची लोकसंख्या २० लाखांनी कमी होणार आहे.

एकीकडे मुंबईची लोकसंख्या कमी होत असताना ठाणे, वसई विरार, मीरा भाईंदर, नवी मुंबईची लोकसंख्या दुप्पट तिप्पट होत होत आहे हे विशेष. २०११च्या जनगणनेनुसार  वसई-विरार शहराची लोकसंख्या फक्त महापालिका क्षेत्रातील १२ लाख २२ हजार ३९० धरण्यात आली आहे. महापालिकेबाहेरची दीड लाख लोकसंख्या गृहीत धरण्यात आलेली नाही. २०४१ मध्ये ही लोकसंख्या ४५ लाखांच्या घरात जाणार आहे.

वसईचा श्वास गुदमरणार

घरे विकण्यासाठी बिल्डर आकर्षक आमिषे दाखवत असतात. मुंबई बाहेरच्या एमएमआर क्षेत्रात कोस्टल रोड, कॉरिडॉर, मेट्रो, वाढीव एफएसआय, स्पेशल टाऊनशिप आदी आमिषे दाखवून ही लोकसंख्या मुंबईच्या वेशीबाहेरच ठेवण्याचा प्रयत्न आहे. यामुळे मुंबईचे ऑक्सिजन असलेल्या वसईचा श्वास गुदमरणार आहे.

मुंबईची लोकसंख्या वसई-विरारमध्ये ढकलण्याचे हे एक पद्धतशीर आखलेले षड्यंत्र आहे. काही वर्षांपूर्वी विरारच्या कोफराड येथील परांजपे बिल्डराच्या योजनेला अशाच पद्धतीने नियम डावलून परवागनी देण्यात आली होती. ती सर्वोच्च न्यायालयात लढा देऊन हाणून पाडण्यात आली होती.

– मनवेल तुस्कानो, अध्यक्ष, निर्भय जनमंच.