26 September 2017

News Flash

ठाण्यात वाहनांची जाळपोळ

पाच दुचाकी, एक रिक्षा जाळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

प्रतिनिधी ठाणे | Updated: July 17, 2017 1:42 AM

पाच दुचाकी, एक रिक्षा जाळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

ठाणे शहरात काही महिन्यांपासून वाहन जळीतकांड सुरू असून रविवारी सकाळी पाचपाखाडी परिसरातील सहा वाहने अज्ञात इसमांनी जाळल्याची घटना घडली.

सिद्धेश्वर तलावाजवळ उभ्या करण्यात आलेल्या पाच दुचाकी आणि एक रिक्षा जाळल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या घटनेत महिला रिक्षाचालकाची अबोली रिक्षाही जाळण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाहन जाळण्याचे प्रकार ठाणे शहरात सातत्याने घडत असल्याने वाहनमालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

वाहन जाळण्याचे प्रकार ठाणे शहरात काही महिन्यांपासून सुरू आहेत. मे महिन्यात लोकमान्य परिसरातही अशाच प्रकारे सहा वाहने जाळण्याची घटना घडली होती. या वाहनांमध्येही पाच दुचाकी आणि एक रिक्षा जाळण्यात आल्या होत्या. या सारखाच प्रकार रविवारी पहाटे पाचपाखाडी परिसरात घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात नौपाडा पोलीस ठाण्यात तपास सुरूआहे.

गेल्या काही महिन्यांपासून ठाणे शहरात वाहन जाळण्याचे प्रकार सातत्याने सुरूअसून पाचपाखाडी परिसरातील सिद्धेश्वर तलाव येथे उभ्या करण्यात आलेल्या पाच दुचाकी आणि एक रिक्षा रविवारी पहाटे पाचच्या सुमारास अज्ञात इसमांनी जाळली. यामध्ये होंडा, टीव्हीएस अशा काही कंपन्यांच्या दुचाकी तसेच सुनीता आंग्रे या महिला रिक्षाचालकाची अबोली रिक्षा जाळण्यात आली आहे. या प्रकरणी सुनीता आंग्रे यांनी अज्ञात इसमाविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

First Published on July 17, 2017 1:42 am

Web Title: vehicle burned in thane
  1. V
    vijay
    Jul 17, 2017 at 9:24 am
    अशा गुन्ह्यांमधील गुन्हेगार सी सी टी व्ही मध्ये सापडले तरी त्यांना शिक्षा होऊ नये म्हणून विविध निमित्तांनी आपली थोबाडे होर्डिंगवर दाखवणारे अनेक 'सामाजिक' कार्यकर्ते पुढे येणार हे उघड आहे.हा सर्व पैशाचा व सत्तेसाठी आपला 'वट' दाखवण्याचा खेळ जोवर सदाचारी जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे तोवर थांबणे अशक्य.पोलिसांच्या अपुऱ्या संख्ये व इच्छाशक्तीमुळे बहुसंख्य सामान्यांची इच्छा नसली तरी कायदा हाती घेऊन गुन्हेगारांना सामान्य लोकांनीच जागेवरच संपवायची वेळ येणार असे दिसते.(नागपूरच्या महिला आठवा.)
    Reply