विनोद तावडे यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ संचालित के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात सुरू असलेल्या गैरकारभाराची शिक्षण विभागाच्या वरिष्ठांतर्फे चौकशी करून, त्यात तथ्य आढळल्यास पेंढरकर महाविद्यालयाचे व्यवस्थापन बरखास्त करून तेथे प्रशासक नियुक्त केला जाईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी महाविद्यालय कर्मचाऱ्यांसोबत संघर्ष समिती आणि राजकीय मंडळींच्या एका शिष्टमंडळाला दिले.

Narendra Modi criticism that Shiv Sena is fake with Congress
काँग्रेसबरोबर नकली शिवसेना! नरेंद्र मोदी यांची टीका, चंद्रपुरात पंतप्रधानांची पहिली प्रचार सभा
Sanjay Raut, Raju Shetty
…तर संजय राऊत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आले असते का ?राजू शेट्टी यांचा प्रतिप्रश्न
arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या जन्मगावातील लोक म्हणतायत…
Sunetra Pawar
रायगड : सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या भेटीला…

के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर संस्था अध्यक्ष व व्यवस्थापनाकडून होणाऱ्या अन्यायाच्या अनेक तक्रारी शिक्षण विभागाकडे येत आहेत, असे सांगत मंत्री तावडे यांनी शिष्टमंडळासमोरच शिक्षण विभागाच्या सहसंचालक डॉ. रमा भोसले यांच्याशी संपर्क केला. पेंढरकर महाविद्यालयाबाबत कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेल्या तक्रारी, मुंबई विद्यापीठ सीनेट सदस्य समितीने या महाविद्यालयातील गैरकारभार आणि प्रशासक नियुक्तीबाबत केलेला अहवाल याबाबत चौकशी करावी. त्यात व्यवस्थापन दोषी आढळले तर तातडीने या महाविद्यालयाचे अनुदान बंद करावे, अशा सूचना तावडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या, असे शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नरेंद्र पवार, संघर्ष समितीचे अध्यक्ष गुलाब वझे, गंगाराम शेलार, कर्मचारी संघटनेचे प्रा. डॉ. दिलीप मेढे, सुवर्णा दाढकर शिष्टमंडळात सहभागी झाले होते. पेंढरकर महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाचे विद्यमान अध्यक्ष प्रभाकर देसाई यांची महाविद्यालयात कशाप्रकारे मनमानी सुरू आहे याचा पाढा शिक्षणमंत्र्यांसमोर वाचण्यात आला. अखेर आश्वासनामुळे रविवारी सकाळी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण समाप्त करण्यात येणार आहे.