ठाण्यातील हरिनिवास परिसरात स्वातंत्र्य पूर्ण काळातील गाड्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ठाण्यातील हेरिटेज व्हेईकल्स ऑर्गनायझेशनकडून प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामुळे अनेक दुर्मिळ वाहने पाहण्याची संधी लोकांना मिळाली आहे. या प्रदर्शनात १९२८ पासून १९७८ पर्यंतच्या गाड्या ठाणेकरांना पाहायला मिळाल्या. यावेळी दुर्मिळ गाड्यांचे फोटो काढण्याचा मोह ठाणेकरांना आवरता आला नाही.

ठाण्यातील हेरिटेज व्हेईकल ऑर्गनायझेशन या संस्थेचे एकूण १५ सदस्य आहेत. नेहमीच चित्रपटात दिसणाऱ्या किंवा खास करुन घरात शोभेसाठी ठेवलेल्या गाड्या रस्त्यावर आल्या तर प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना त्यांचे महत्व समजेल, असे प्रदर्शनाच्या आयोजकांनी सांगितले. ठाण्यातील या प्रदर्शनाच्या माध्यमातून जुन्या काळ्यातील चारचाकी आणि दुचाकी वाहने लोकांना पाहायला मिळाली.