ऐतिहासिक जुन्या कल्याण शहराच्या वेशीवर आधारवाडी येथे कचऱ्याचा मोठा डोंगर नजरेत भरतो. खरे तर कचरा सामावून घेण्याची या जागेची क्षमता कधीच संपली आहे. मात्र अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने इथेच कचरा टाकला जात आहे. योग्य पद्धतीने कचऱ्याचे व्यवस्थापन होत नसल्याने या परिसरात सदैव दरुगधी पसरलेली असते. या कचराभूमीवर काम करणाऱ्यांची कुटुंबे लगतच्या अण्णा भाऊ साठेनगरमध्ये राहतात. त्यांची मुले इथेच कचऱ्यात खेळतात, लहानाची मोठी होतात.

दिवसेंदिवस वाढत असलेल्या कल्याण शहराचा कचरा येथे आणून टाकला जातो. मात्र कचरा हाताळणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना किमान हातमोजे, चेहऱ्याला बांधण्यासाठी मास्कसुद्धा पालिकेतर्फे पुरवण्यात येत नाहीत. अशा प्रकारे अत्यंत अपुऱ्या साधनांनी धोकादायक पद्धतीने कर्मचारी इथे काम करीत असतात.

या कचऱ्यामध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्यांचा ढीग पाहायला मिळतो. कचऱ्यामुळे परिसरातील रहिवाशांना दरुगधीबरोबरच माश्यांचाही त्रास होतो. रात्री डासांमुळे येथील रहिवासी हैराण होतात. डासांच्या प्रादुर्भावामुळे त्यांच्या आरोग्याला कायम धोका संभवतो. या वसाहतीत नेहमीच आजारी माणसे आढळतात. पावसाळ्यात घरात पाणी शिरते. उन्हाळ्यात कचराभूमीवर वरचेवर आग लागते, त्यामुळे जीव गुदमरतो, असे येथील अवंतिका खंडागळे यांनी सांगितले.

दररोज एकूण ६५० टन कचरा कल्याण -डोंबिवली या शहरातून येथे आणला जातो. आता पावसाळा म्हणून नव्हे तर बाराही महिने इथे खड्डे आणि चिखल साचलेला असतो, असे येथील धृपदा बोटे यांनी सांगितले.

शुद्धीकरण यंत्राने अधिक दरुगधी

सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेतर्फे दोन यंत्रे बसविण्यात आली आहेत. मात्र त्यापैकी एक यंत्र बंद आहे. या बंद यंत्राच्या ठिकाणी सांडपाणी साचल्याने मोठय़ा प्रमाणात दरुगधी पसरली आहे. महापालिकेतर्फे सांडपाणी पुनप्र्रक्रिया करण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या यंत्रामुळे या परिसरात अधिकच दरुगधीचा त्रास सहन करावा लागत असल्याचे वस्तीतील नागरिकांनी सांगितले.