वसईतील बागायती पट्टय़ातून टँकरसाठी पाणीपुरवठा, शेती संकटात; आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारा
वसई-विरार शहरातील वाढत्या पाणीटंचाईचा फायदा घेऊन आपला व्यवसाय तेजीत आणण्यासाठी टँकरमाफियांनी वसईच्या पश्चिमेकडील बागायती क्षेत्रातील विहिरींमधून पाणीउपसा करण्यास सुरुवात केली आहे. पावसाळा उलटून दोन महिने होण्याच्या आताच टँकर पुरवठादार या विहिरींतले पाणी काढून घेऊ लागल्यामुळे याचा मोठा परिणाम परिसरातील शेतीवर होण्याची भीती आहे.
वसई-विरार शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणात यंदा तीस टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शहरात एक-दोन दिवसआड पाणीपुरवठा होत आहे. परिणामी टँकरद्वारे पाणी खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत टँकर पुरवठादार वसईच्या पूर्वेकडील गावांतून पाणी आणून शहरात विकत होते. प्रांतंधिकाऱ्यांनी १९९२ च्या शुद्ध पाणीे पुरवठा अधिनियमाअन्वये अनेक विहिरींवर पाणीे उपसा करण्यास बंदी घातलीे आहे. मात्र, आता ‘टँकरलॉबी’ने आपला मोर्चा पश्चिमेकडील बागायती पट्टय़ाकडे वळवला आहे. उमराळे गावातीेल काही विहिरींतून पाणीउपसा होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. जानेवारी महिन्यापासून पाण्याची मागणी अधिक वाढण्याची शक्यता आहे. अशा वेळी येथील विहिरींतून मोठय़ा प्रमाणात पाणीउपसा होईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याठिकाणी काही बांधकाम व्यावसायिकांनी स्थानिकांना हाताशी धरून विहिरी खणल्या आहेत. त्यामुळे या पट्टय़ातील भूजल पातळीही खालवण्याची भीती नंदाखाल ग्रामस्थांनी व्यक्त केली.
पश्चिम पट्टय़ातीेल गावे यापूर्वीच महापालिका नको म्हणून संघर्ष करत आहेत. आता गावातून पाणीे उपसा झाला तर हा संघर्ष अधिक चिघळला जाण्याची शक्यता आहे. टँकर जर गावात शिरले तर गावात अपघात होतीेल, रस्ते बिघडतीेल आणि गावातले वातावरण बिघडेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

पाणी पिण्यास अपायकारक
काही वर्षांपूर्वी एएफपीआरओ आणि ग्राउंड वॉटर सव्र्हे डेव्हलपमेंट या केंद्राच्या अखत्यारितीेल दोन संस्थांनी वसईतल्या विहिरींचे सर्वेक्षण करून तेथीेल पाण्याचे पृथ्थकरण केले होते. पिण्याच्या पाण्यातले जडत्व तीेनशे युनिटसपर्यंत असले तर चालू शकते. परंतु येथीेल विहिरींच्या पाण्याचे जडत्व सहाशे ते दोन हजार युनिटपर्यंत आहे. त्यामुळे हे पाणीे पिण्यासाठी वापरले तर ते आरोग्याला अपायकारकच असणार आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करून टँकरमाफिया पाणीपुरवठा करत आहेत.