स्टेम प्राधिकरणाने ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठय़ाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार आता ठाणे शहरात मंगळवार आणि बुधवारी तर कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात गुरुवारी आणि शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यानंतरच्या दिवशीही या शहरांना कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. यामुळे आठवडय़ातील तीन दिवस ठाणेकरांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागण्याची चिन्हे आहेत.