वसंत ऋतूच्या आगमनाची पहिली चाहूल आपल्याला कोकीळच्या गायनाने होते. यातील नराला कोकीळ तर मादीला कोकिळा असे म्हणतात. हा पक्षी जवळजवळ संपूर्ण भारतात आढळतो. यातील नर आणि मादीमध्ये दिसण्यात खूपच तफावत आहे. नर हा चमकदार निळसर काळा असतो तर मादीचा रंग मात्र करडा असतो. मादीच्या पोटावर असंख्य आडव्या पांढऱ्या रेषा आणि पाठीवर पांढरे ठिपके दिसतात. सध्या या पक्ष्याचा विणीचा हंगाम आहे. ही कोकिळा स्वत:चे घरटे बांधत नाही. विविध फळे, अळय़ा, कीटक हे या पक्ष्याचे प्रमुख खाद्य. यातीलच वडाच्या फळांवर ताव मारताना ही कोकिळा. तिचा हा नखरा टिपलाय सातारा जिल्ह्य़ातील अजिंक्यताऱ्याच्या भटकंतीत.

Shukra Gochar in Mesh
२४ तासांनी ‘या’ ६ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? शुक्रदेवाच्या कृपेमुळे व्यापारात होऊ शकतो मोठा फायदा
shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
parbati barua, elephant, Hasti Kanya, Gauripur, Assam, mahout
हत्तीच तिचे मित्र
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू