ट्रेक डायरी
मलेशियातील बोर्नियो बेट ‘हॉर्नबिलचा प्रदेश’ म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच येथील वृष्टीवन जगात सर्वात जुने समजले जाते. दुर्मिळ ओरांगउटान सोबत जगातील प्राण्यांच्या २० टक्के प्रजाती मलेशियात सापडतात. काही प्रजाती जगात अन्यत्र कोठेच सापडत नाहीत. अशा या बेटावर २८ मे ते ५ जूनच्या दरम्यान बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वतीने जंगल सफारीचे आयोजन केले आहे.  या सफारीमध्ये बाको, गुनुंग गदिंग व मुलू राष्ट्रीय उद्यानांत जायची संधी मिळेल. बाकोमध्ये सोंडय़ा माकड, चंदेरी माकड व खेकडा खाणारे माकड आणि किटकभक्षी घटपर्णी वनस्पती सापडतात. गुनुंग गदिंगमध्ये राफेलशिया हे महाकाय फुल सापडते तर मुलू हे जागतिक वारसा स्थळ आहे. तिथे वृष्टीवनांतील गुंफा समूह व आठ प्रकारचे हॉर्नबिल (धनेश) दिसतात. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी bnhs.programmes@gmail.com या संकेतस्थळावर किंवा हॉर्नबिल हाउस (०२२-२२८२१८११/ २२८७१२०२) इथे संपर्क साधावा.
ताडोबा जंगल सफारी
‘निसर्ग सोबती’तर्फे येत्या २७ ते २९ एप्रिल, ८ ते १० मे आणि २९ ते ३१ मे दरम्यान ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीचे आयोजन केले आहे. ताडोबा हा देशातील एक महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे. ६२३ चौरस किलोमीटर क्षेत्र असलेल्या या जंगलाचा राजा वाघ आहे. इथे वाघांशिवाय बिबटय़ा, गवे, सांबर, चितळ, वानर, भेकर, मगरींसह अन्य प्राणीही दिसतात. अनेक पशुपक्ष्यांचा मुक्त वावर आहे. नवरंग, स्वर्गीय नर्तकसारखे दुर्मिळ पक्षी या जंगलात दिसतात. अधिक माहितीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७, ६८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
साल्हेर-मुल्हेर मोहीम
‘एक्सप्लोर्स’तर्फे येत्या ९ ते १० फेब्रुवारी रोजी  साल्हेर, मुल्हेर पदभ्रमणाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आनंद केंजळे (९८५०५०२७२३) यांच्याशी संपर्क साधावा.